Kangana Ranaut : समाज म्हणून आपण अपयशी, आत्मपरीक्षण करावे लागेल; कंगना राणावत यांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी माफी मागणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut) यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, मुलांवर होणारे राजकीय प्रभाव आणि त्यांच्या संगोपनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.



कंगना राणावत यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संबंधित मुलीच्या माफीनाम्याच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. त्या मुलीचे वय अवघे १५ वर्षे आहे आणि ती स्वतः असे सांगत आहे की, तिने कधीही पंतप्रधान मोदींविरोधात कोणतीही पोस्ट केली नव्हती. त्या दिवशी तिचे मित्र तिला तिथे घेऊन गेले आणि तेथील लोकांनी तिला पंतप्रधानांविरोधात शिवीगाळ करण्यासाठी प्रवृत्त केले. आपल्या मुलांना वाईट विचारसरणीच्या फेमिनिस्ट (स्त्रीवादी) आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या प्रभावापासून वाचवणे गरजेचे असल्याचे कंगना यांनी म्हटले आहे. "लक्ष द्या, एकाही स्कार्फ किंवा बुरखा घालणाऱ्या मुलीने असे असभ्य प्रदर्शन केले नाही, मग आपल्याच मुली इतक्या सहज भरकटल्या का जातात? कुठेतरी एक समाज म्हणून आपण अपयशी ठरत आहोत. आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल आणि आपल्या मुलींचे रक्षण करावे लागेल," अशा शब्दांत त्यांनी पालकांना आणि समाजाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे.



नीट पेपरफुटीची गंभीर दखल घेत मोदी सरकारने तातडीने चौकशी सुरू केली आणि परीक्षा रद्द केली. पेपरफुटी प्रकरणी अनेकांना अटक झाली आणि त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency or NTA) नीट यूजी परीक्षेसाठी घेतलेली फी विद्यार्थ्यांना परत केली. नंतर एनटीएने फेरपरीक्षेची तारीख जाहीर केली आणि स्वतःकडे असलेल्या निधीतून फेरपरीक्षेचा खर्च केला. फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. एवढे सगळे झाले असताना नीट पेपरफुटीचा निषेध म्हणून निवडक मंडळींनी सीजेपी अशी ओळख सांगत सरकार विरोधात आंदोलन सुरू केले. काही जण या आंदोलनात सीजेपी समर्थक म्हणून सहभागी झाले. फेरपरीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर झालेल्या या आंदोलनात काही मुलांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. यातील एका अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत संबंधित मुलगी पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आईच्या नावाचा उल्लेख करत आक्षेपार्ह भाषेचा वापर करताना स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओवरून गदारोळ सुरू झाला. आंदोलनाचे स्वातंत्र्य असले तरी कोणालाही शिवीगाळ करणे योग्य नाही, असा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला. पंतप्रधान आणि त्यांच्या आईला शिव्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि व्हायरल व्हिडीओत दिसलेली मुलगी घरातून पळून गेली. हा प्रकार समजताच पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ केला आणि आंदोलन करणाऱ्या मुलांना त्यांच्या वयाचा विचार करून माफ केले. मोदींचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि काही तासांतच घरातून फरार झालेल्या मुलीचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत संबंधित मुलगी पंतप्रधान मोदींची माफी मागताना दिसत आहे. मुलीचा हा व्हिडीओ आल्यानंतर कंगनाने सोशल मीडिया पोस्ट केली आणि समाज म्हणून आपण अपयशी ठरलो का याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

Comments
Add Comment

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार