Jammu Kashmir Terror Attack : धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; एकाचा मृत्यू

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांवर गोळीबार (Terror Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात छत्तीसगडमधील एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केलम परिसरात दहशतवाद्यांनी दोन स्थलांतरित मजुरांना अडवले. त्यानंतर त्यांची ओळख आणि धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Kulgam)

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर सील करून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी दोन्ही मजूर छत्तीसगडमधील असल्याची माहिती दिली. (Jammu Kashmir)

या हल्ल्यामागे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासात मोहम्मद लतीफ या संशयिताचे नाव समोर आले आहे. तो गेल्या वर्षी लष्कर-ए-तोयबा आणि द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनांशी जोडला गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी आहे. (Kashmir News)

पलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू


गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये स्थलांतरित मजूर आणि पर्यटकांना लक्ष्य करून हल्ले झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबल येथे सुरू असलेल्या बोगदा प्रकल्पावरील मजुरांवर गोळीबार करण्यात आला होता. तसेच 2024 मध्ये अनंतनाग आणि श्रीनगरमध्येही बाहेरील राज्यांतील मजुरांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. (Jammu Kashmir Attack) कुलगाममधील ताज्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

 

 
Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी