BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले झाकण



मुंबई : कुर्ला साकीनाका येथे पर्जन्य जलवाहिनीच्या चेंबरच्या झाकणाच्या आतील बाजूस जाळी बसवण्याच्या कामादरम्यान कंत्राटदाराच्या निष्काळजी पणामुळे अस्लम शेख नावाच्या व्यक्तीच्या मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दादर पूर्वेला अशा चेंबरचे (मॅनहोल) झाकण काढून त्याच्या आतील लोखंडी जाळीची चोरी करण्याचा प्रयत्न झाला. पण ती जाळी आत चेंबरमध्ये पडली आणि त्यांची ही चोरी फसली. पण त्यानंतर चोरट्यांना याचे झाकण लावता न आल्याने त्यांनी ते तसेच ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ही त्वरीत निदर्शनास आल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा चेंबरचे झाकण सुस्थितीत लावण्यात आले. दरम्यान याबाबत शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनी याची रीतसर तक्रार नोंदवून अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. पण याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एन सी नोंदवून घेतली आहे.



स्थानिक नगरसेवक आणि महापालिका शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार


रविवारी ०२.०८.२०२६ रोजी सकाळी सुमारे ०९:२४ वा., खोदादाद सर्कल (दादर टी.टी.), दादर (पूर्व), मुंबई येथे पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले की, अज्ञात व्यक्तीने पर्जन्य जलवाहिनी चेंबरवरील संरक्षक ग्रील चोरी करण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या प्रयत्ना दरम्यान संरक्षक ग्रील चेंबरमध्ये पडल्यामुळे संबंधित व्यक्तीस ती चोरी करता आली नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने चेंबरचे झाकण व्यवस्थित न लावता घटनास्थळावरून पळून गेली, त्यामुळे नागरिकांच्या तसेच वाहनांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला होता.


ही बाब तात्काळ देखभाल कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी चेंबरमधून संरक्षक ग्रील बाहेर काढून ती पूर्ववत बसविली तसेच चेंबर सुरक्षित स्थितीत करण्यात आले. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफ.आय.आर. दाखल करण्याची विनंती करण्यात आली. परंतु, स्थानिक पोलिसांनी एफ.आय.आर. नोंदविण्यास नकार देऊन केवळ एन.सी नोंदविण्यास तयारी दर्शविली असल्याचे नमूद केले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने