Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६ वर्षीय महिलेला गेल्या दोन वर्षांपासून पोटाची वाढती सूज, बोथट पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या आरोग्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने  महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय (राजावाडी रुग्णालय) येथील स्त्रीरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचार घेण्यास सुरूवात केली होती. या रूग्णाच्या गर्भाशयातून सुमारे ५.५ किलो वजन आणि ३० सेंटीमीटर आकाराची गाठ काढण्यात रूग्णालयाच्या चमूला यश आले. (Rajawadi Hospital)




आरोग्याच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने या रूग्णाची संपूर्ण वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. या तपासणी दरम्यान रुग्णामध्ये सुमारे ३० सेमी आकाराची गर्भाशयातील गाठ (ट्युमर) असल्याचे निदान झाले. प्राथमिक निदानानुसार ही गाठ जायंट लिओमायोमा असल्याचा संशय होता. शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सर्व आवश्यक खबरदारी व नियोजन करण्यात आले. त्यानुसार रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.




स्त्री रोग विभागामार्फत करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. स्वाधिना बी. मोहंती, डॉ. शालिनी बगारिया, डॉ. अरवा कांबळे आणि डॉ. काजल साळवी यांनी महत्वाची भूमिका बजावली. भूलतज्ज्ञ डॉ. छवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेयश आणि डॉ. नेत्रा यांनी भूल विभागाची जबाबदारी सांभाळली. तसेच सर्जिकल स्टाफ नर्स नीलाक्षी गुरव आणि त्यांच्या टीमने शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले.




ट्युमरचा मोठा आकार आणि त्यामधील वाढलेली रक्तवाहिन्यांची जाळी  यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काढलेला ५.५ किलो ट्युमर हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या चाचणीचा अंतिम अहवाल प्रतिक्षेत आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर विशेष काळजीपूर्वक उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी रूग्णाला उत्तम प्रकृतीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मोठ्या आकाराच्या गर्भाशयातील गाठीची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ अशी आहे.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने