Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मेट्रो प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कांजुरमार्ग कारशेडसाठी केंद्र सरकारच्या स्तरावर भूसंपादन रखडल्याने मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतरही ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कांजुरमार्ग कारशेडचा प्रश्न सुटेपर्यंत मेट्रो-६ चे काम थांबवण्याऐवजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ‘एमएमआरडीए’ने पर्यायी मार्ग स्वीकारला असून ही मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.



पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी थेट जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी १९ एप्रिल २०२३ रोजी सुमारे १५ हेक्टर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली. या निर्णयाला केंद्र सरकारच्या मिठागर (सॉल्ट पॅन) विभागाने न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या जमिनीबाबत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे कारशेडच्या प्रत्यक्ष बांधकामाला मोठा धक्का बसला. आता संबंधित याचिका मागे घेण्यात आली असली, तरी जमिनीच्या वापरबदलाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. हा प्रश्न सुटण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. जून २०२६ मधील अहवालानुसार प्रकल्पाची सुमारे ८८ टक्के प्रगती झाली आहे. त्यामुळे कारशेडची जमीन मिळण्यास विलंब झाला, तरी मेट्रो मार्ग-६ कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा