Ahilyanagar : शनैश्वर देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर (Shani Shingnapur) हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील आर्थिक व्यवहारांचे फॉरेनसिक लेखापरीक्षण केले जाणार आहे. हे लेखापरीक्षण 1 जानेवारी 2020 ते 2025 या कालावधीतील केले जाणार आहे अशी माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली आहे. शनिश्वर देवस्थानचे तब्बल पाच वर्षाचे म्हणजे एक जानेवारी 2020 ते 2025 या कालावधीतील हे फॉरेन्सिक ऑडिट (Forensic Audit) केले जाणार आहे.



आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी


शनैश्वर देवस्थानच्या (Shanaishwar Temple) फॉरेन्सिक ऑडिटसाठी जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारी दरबारी जाऊन न्याय व विधी विभागाकडे मान्यतेसाठी पाठवलेला होता. यानंतर या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता प्राप्त झाल्यानंतर हे फॉरेन्सिक ऑडिट सुरू करण्यात आले असून त्यासाठी मुंबई स्थित सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या काळातील फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे तो कालावधी देवस्थानवरील विश्वस्त मंडळाचा आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून विश्वस्त मंडळ बरखास्त करून त्यावर नाशिक विभागीय आयुक्ताची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.



...तर पुन्हा न्यायालयात जाणार


त्यानंतर व्यवसायामध्ये पूजा अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा झालेला गैरव्यवहार च्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भाविकांची रक्कम परस्पर देवस्थानच्या काही कर्मचार्‍यांच्या नावावर जमा होत असल्याचे आरोप होता जो पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे तसेच कामगार भरती वादग्रस्त असून कोणतेही निकष न लावता कारभार चालू असल्याचा आक्षेप वारंवार घेतला जात होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात जो पर्यंत ईडी आणि सीबीआय मार्फत संपूर्ण तपास होत नाही व घोटाळे बाजांवर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. 8 आठवड्यात कारवाई केली नाही तर पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचे याचिकाकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण