NDA Mangal Milan : एनडीएची मंगल मिलन बैठक मंगळवार ४ ऑगस्ट रोजी होणार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सोमवार ३ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. निवडक महत्त्वाच्या विधेयकांवर संसदेत चर्चा सुरू आहे तर अँटी पेपर लीक हे महत्त्वाचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. सत्ताधारी चर्चेस उत्सुक असताना विरोधक घोषणाबाजी करण्यात गुंतले असल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत बोलताना विरोधी पक्षनेत्याला कडक शब्दात सुनावले. चर्चेसाठी वारंवार संधी देऊनही विरोधक विधेयकावर चर्चा करण्यास उत्सुक नसल्याचे रिजिजू म्हणाले आणि वातावरण तापले. या पार्श्वभूमीवर भाजपने एनडीए मंगल मिलन बैठकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.



भाजपच्या संसदीय पक्षाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार एनडीएची मंगल मिलन बैठक मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता संसद भवनातील ग्रंथालयात जी. एम. सी. बालायोगी सभागृहात होणार आहे. या बैठकीसाठी एनडीएतील सर्व घटक पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले आहे.



परंपरेनुसार एनडीएच्या घटक पक्षांची मंगल मिलन बैठक अधिवेशन काळात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी होत आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएची पहिली मंगल मिलन बैठक मंगळवार २१ जुलै २०२६ रोजी झाली. यानंतर २८ जुलैच्या मंगळवारीही बैठक झाली. आता ४ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. ही यंदाच्या अधिवेशन काळातील एनडीएच्याघटक पक्षांची तिसरी बैठक आहे. या बैठकीच्या माध्यमातून एनडीएच्या घटक पक्षांतील समन्वय वाढवण्यावर भर दिला जात आहे. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेले आणि आता एनसीपीआयमध्ये असलेले खासदार पण या बैठकीला येणार आहेत. मंगल मिलन बैठक ज्ञानवर्धक असतात. या बैठकांतून खूप मौल्यवान असे मार्गदर्शन मिळत असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार