Pimpri Chinchwad Crime : हृदयद्रावक! आर्थिक संकटामुळे उद्ध्वस्त झालं उच्चशिक्षित कुटुंब

पिंपरी - चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या पिल्लई कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेत आणखी एक हृदयद्रावक घडामोड समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचललेल्या या कुटुंबातील कुटुंबप्रमुख विनोद पिल्लई यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर उपचार सुरू असलेल्या त्यांच्या पत्नी शैलेजा (सिरजा) पिल्लई आणि १९ वर्षीय मुलगी पौर्णिमा पिल्लई यांचाही रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला असून संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. (Pimpri Chinchwad Crime)


मूळचे केरळ येथील असलेले पिल्लई कुटुंब पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. शुक्रवारी रात्री घरात विषारी वायूमुळे तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. विनोद पिल्लई यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलीला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान दोघींनीही अखेरचा श्वास घेतला. (Pimpri Chinchwad Crime)



घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक संकटामुळे जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख आहे. तसेच या निर्णयासाठी इतर कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास संत तुकाराम नगर पोलीस करत आहेत.



आर्थिक संकटामुळे वाढला ताण :


प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पिल्लई कुटुंब काही वर्षांपूर्वी नेहरूनगरमधील स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांना तो फ्लॅट विकावा लागला आणि त्यानंतर ते मोरवाडीत भाड्याच्या घरात राहत होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये विनोद पिल्लई यांनी नोकरी सोडल्यानंतर आर्थिक संकट अधिकच गडद झाले. त्यात मूळ गावी सुरू असलेल्या घराच्या बांधकामामुळे आर्थिक भार वाढल्याची माहितीही समोर आली आहे. सततच्या आर्थिक तणावामुळे कुटुंब मानसिक तणावाखाली होते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Pimpri Chinchwad Crime)



आधीपासूनच सुरू होते नियोजन :


या प्रकरणाच्या तपासात आत्महत्येचे नियोजन एक-दोन दिवसांचे नसून त्यासाठी बराच काळ तयारी सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. तपासात विनोद पिल्लई यांनी जून महिन्यातच एक घातक रसायन ऑनलाइन मागवल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून त्यांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापराची माहिती तपासली जात असून या घटनेमागील सर्व पैलूंचा सखोल तपास सुरू आहे. (Pimpri Chinchwad Crime)



उच्चशिक्षित कुटुंबाच्या मृत्यूने हळहळ :


पिल्लई कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित होते. विनोद पिल्लई यांनी प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थेतून शिक्षण घेतले होते. त्यांच्या पत्नी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांची एकुलती एक मुलगी पौर्णिमा ही कॉम्प्युटर सायन्सच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. सुशिक्षित आणि उज्ज्वल भविष्य असलेल्या या कुटुंबाने आर्थिक संकटामुळे असा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Pimpri Chinchwad Crime)

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण