Women Heart Attack Video : 'अचानक छातीत दुखू लागलं... अन् पुढच्या 5 मिनिटांत जे घडलं ते थक्क करणारं! Video Viral

पुणे बसस्थानकावर महिलेला हार्ट अटॅक; महिला कंडक्टर बनली देवदूत


पुणे: पुण्यातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकावर एक महिला प्रवासी अचानक बेशुद्ध पडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, एसटीच्या महिला वाहकाने प्रसंगावधान राखत वेळेत CPR (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) दिल्यामुळे महिलेचा जीव वाचला. या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. (Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा सुनील जैन या छत्रपती संभाजीनगर येथून मालेगावला जाण्यासाठी पुण्यातील मध्यवर्ती बसस्थानकावर आल्या होत्या. बसची वाट पाहत असताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. काही क्षणांतच त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्या कोसळल्या. (Heart Attack)

घटना लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या महिला वाहक संगीता पालवे यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता ओळखून त्यांनी तातडीने महिलेवर CPR सुरू केला. त्यांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे महिलेच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू होण्यास मदत झाली. (ST Bus)



दरम्यान, इतर एसटी कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीचा निर्णय घेत महिलेला रिक्षामधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. ( Women Heart Attack)

रुग्णालयात डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. वेळेवर CPR मिळाल्यामुळे आणि तत्काळ वैद्यकीय उपचार झाल्याने महिलेचा जीव वाचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (Pune Bus Stand)

या संपूर्ण घटनेत सहायक वाहतूक निरीक्षक बाबासाहेब साळुंके, महिला वाहक संगीता पालवे, सुरक्षा रक्षक कविता भुतेकर आणि रवींद्र गरड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वांनी समन्वयाने आणि शांतपणे परिस्थिती हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Viral Video)

या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत CPR चे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. योग्य वेळी दिलेला प्रथमोपचार आणि प्रसंगावधान यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या या मानवतावादी कार्याचे प्रवासी आणि नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

 
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी