Eknath Shinde : ‘लोकप्रतिनिधी सत्तेचा मालक नाही, जनतेचा सेवक’; शिवसेना लोकप्रतिनिधींना एकनाथ शिंदेंचा विकास, लोकसेवा आणि नेतृत्वाचा मंत्र

ठाणे : "लोकप्रतिनिधी हा नगराचा किंवा सत्तेचा मालक नसतो, तर जनतेचा सेवक असतो. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून जनतेमध्ये राहा, नागरिकांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखा," असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना दिला.


रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित शिवसेनेच्या नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षण शिबिरात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेनेचे महाराष्ट्र संघटन प्रमुख डॉ. बालाजी किनीकर, आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.



‘Chief Minister म्हणजे Chief Servant’


आपल्या भाषणात शिंदे (Eknath Shinde) यांनी पदापेक्षा सेवाभावाला अधिक महत्त्व देत सांगितले की, "मी मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो; पण स्वतःला कधीही मोठा समजले नाही. माझ्यासाठी Chief Minister म्हणजे Chief Servant. आजही मी स्वतःला कार्यकर्ता मानतो आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे." त्यांनी लोकप्रतिनिधींना पदाचा गर्व न करता जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचा सल्ला दिला. "आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री ही पदे तात्पुरती असतात; मात्र कार्यकर्ता ही ओळख कायमची असते," असेही त्यांनी नमूद केले. (Eknath Shinde)



‘माणसं कमवा, मालमत्ता नव्हे’ :


राजकारणात यशाचे खरे मोजमाप संपत्ती नसून जनतेचा विश्वास असल्याचे सांगत शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "किती मालमत्ता कमावली यापेक्षा किती माणसं जोडली, किती लोकांचा विश्वास जिंकला हे महत्त्वाचे आहे. नागरिकांचा फोन उचला, त्यांच्या अडचणींना तत्काळ प्रतिसाद द्या आणि नम्रतेने वागा. यामुळेच पुन्हा जनतेचा विश्वास मिळतो."



विकासासोबत पर्यावरणाचाही समतोल आवश्यक :


कार्यक्रमापूर्वी वृक्षारोपण केल्याचा उल्लेख करत त्यांनी (Eknath Shinde) हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. विकासकामांमध्ये शक्यतो वृक्षतोड टाळावी आणि आवश्यक असल्यास त्यापेक्षा अधिक वृक्षारोपण करावे, असे आवाहन त्यांनी केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, शहरातील एखादे झाड तोडले गेले किंवा पाण्याची पाइपलाइन फुटली तरी बाळासाहेब स्वतः चौकशी करत असत. "विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हेच खरे नेतृत्व आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.



प्रशासनाशी संघर्ष नव्हे, समन्वय हवा :


लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास विकासकामांना गती मिळते, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना शत्रू न मानता नियम समजून सकारात्मक संवादातून काम करून घेण्याचा सल्ला दिला.



अभ्यासू लोकप्रतिनिधी घडवण्यावर भर :


महापालिका कायदा, अर्थसंकल्प, सभागृहाचे कामकाज, स्मार्ट सिटी, क्लस्टर पुनर्विकास, सोशल मीडिया, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि शाश्वत विकास या विषयांचा प्रत्येक नगरसेवकाने अभ्यास केला पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले. "कोणीही परिपूर्ण नसतो. शिकणे कधीही थांबवू नका," असा सल्लाही त्यांनी दिला. (Eknath Shinde)



क्लस्टर पुनर्विकास आणि एमएमआरमधील विकासकामांचा उल्लेख :


ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पुनर्विकास योजनेचा उल्लेख करत त्यांनी ही संकल्पना केंद्र सरकारनेही स्वीकारल्याचे सांगितले. तसेच अटल सेतू, मेट्रो, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक, ठाणे-बोरिवली बोगदा, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाला मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.



स्वच्छ प्रभागाला एक कोटींचे बक्षीस :


महापालिकांनी प्रभागनिहाय स्वच्छतेची स्पर्धा आयोजित करून सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रभागाची निवड करावी, अशी सूचना करत शिंदे यांनी अशा महापालिकेला राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी लोकप्रतिनिधींना जनतेशी सतत जोडून राहण्याचे आवाहन करत सांगितले की, "प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान आयुष्यभर उपयोगी पडते. विकास, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि लोकाभिमुख प्रशासन यांवर भर देऊन मिळालेल्या संधीचे सोनं करा." (Eknath Shinde)

Comments
Add Comment

Nashik Maha Goda Aarti: रामकुंडावर 31 ऑक्टोबरला केली जाणार ‘महा गोदा आरती’, नाशिक जिल्ह्यातील गावकरी घेणार सहभाग

नाशिक: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शुभारंभ केला

Kumbha Mela 2027: नाशिकमध्ये 501 जणांचा शंखनाद गुंजणार, रचणार विश्वविक्रमाचा इतिहास

नाशिक, 18 ऑक्टोबर 2026: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येत्या 25 ऑक्टोबरला 501 जण एकाच वेळी शंखनाद

Obsession Movie: एक इच्छा आणि आयुष्याला अनपेक्षित वळण! काय आहे व्हायरल One Wish Willow?

चित्रपटात जर हॉरर सीन्स असतील तर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढते. त्या भूकिमिकेबद्दल कुतूहल निर्माण होते.

Koffee With Karan 9: रश्मिका विजयच्या पाठी लग्नासाठी हात धुवून लागलेली, स्वत: अभिनेत्रीनेच केला शॉकिंग खुलासा

मुंबई: करण जोहरचा सुप्रसिद्ध चॅट शो, 'कॉफी विथ करण' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या ह्या शोचा नऊवा सीझन सुरू आहे.

‘रणबाली’ची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवशी किती कमाई?

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा 'रणबाली' या चित्रपटाच्या देशांतर्गत कमाईत

OTT वर नव्या रोमँटिक कॉमेडीचा धुमाकूळ! 6 भागांची सिरीज टॉप 10 मध्ये

दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही ना काही नवीन प्रदर्शित होत असतं. रोमँटिक सिनेमा किंवा सिरीज हे