BMC contractors fight : BMC कार्यालयाबाहेर कंत्राटदारांमध्ये तुफान राडा! एकमेकांवर केले सुऱ्याने वार; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माटुंगा येथील एफ-नॉर्थ (F-North) वॉर्ड कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये चाकूने एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागरी कामाच्या टेंडरच्या वादातून ही हिंसक चकमक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, महापालिका कार्यालयांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



शाब्दिक चकमक अन् थेट सुऱ्याने वार!


सोमवारी घडलेल्या या घटनेत दोन कंत्राटदारांमध्ये सुरुवातीला जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनीही सोबत आणलेले सुरे काढून एकमेकांवर हल्ला चढवला. या रक्तरंजित संघर्षात एका कंत्राटदाराच्या थेट पोटात सुरा खुपसला गेला, तर दुसऱ्याच्या पायावर गंभीर वार झाला. घटनेनंतर लगेचच दोघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही कंत्राटदारांविरुद्ध 'हत्येचा प्रयत्न' (Section 307) केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच दोघांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.



टेंडरचा वाद की दुसरं काही कारण ?


हा राडा नेमका कशामुळे झाला याचे कारण अजून अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र, बीएमसीच्या एखाद्या कामाच्या कंत्राटावरून किंवा टेंडरवरून हा वाद उद्भवल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही जखमींची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचे अधिकृत जबाब नोंदवले जातील, त्यानंतरच या हल्ल्यामागचे खरे कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे बीएमसी कार्यालयांच्या सुरक्षा व्यवस्थेची पुरती पोलखोल झाली आहे. महापालिका कार्यालयांमध्ये दररोज शेकडो नागरिक येत असतात आणि सुरक्षेच्या नियमांनुसार मुख्य प्रवेशद्वारावर 'मेटल डिटेक्टर' (Metal Detector) आणि सुरक्षा रक्षक असतात. असे असतानाही हे दोन्ही कंत्राटदार धारदार सुरे घेऊन आत किंवा परिसरात कसे काय पोहोचले? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.



CCTV फुटेजची पाहणी अन् पोलीस बंदोबस्त वाढवला


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, जेणेकरून पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये. याशिवाय माटुंगा पोलीस परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी करत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने