Python Snake : अंधेरीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे पाळला होता अजगर! वनविभागाच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे अजगर पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनविभागाने अंधेरी पोलिसांच्या मदतीने केलेल्या छाप्यात एका फ्लॅटमधून अजस्त्र अजगर जप्त केला. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ( Python Snake)


मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेतील गुंदवली येथील कॅलिस्टा (Callista) सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अजगर पाळला जात असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने अंधेरी पोलिसांच्या मदतीने संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. कारवाईदरम्यान घरातून अजगर सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आला. (Andheri)


विशेष म्हणजे, त्या इमारतीत राहणाऱ्या बहुतांश रहिवाशांना फ्लॅटमध्ये एवढा मोठा साप पाळण्यात आल्याची कोणतीही कल्पना नव्हती. ही माहिती समोर आल्यानंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इमारतीत इतका मोठा वन्य प्राणी कसा आणला गेला, याची चर्चा सुरू आहे.



वनविभागाने अजगराला ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित रहिवाशाविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ( Mumbai News)


वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत अजगराचा समावेश अनुसूची-१ (Schedule-I) मधील संरक्षित प्राण्यांमध्ये होतो. त्यामुळे अजगर पाळणे, विकत घेणे, विक्री करणे किंवा घरात ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. केवळ मान्यताप्राप्त प्राणीसंग्रहालय, बचाव केंद्र किंवा वनविभागाच्या विशेष परवानगीनेच अशा प्राण्यांची देखभाल करता येते.


या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीला 3 ते 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत दंडाचीही तरतूद आहे. वनविभाग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने