SIR Campaign : राज्यात 'एसआयआर' मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच 'एसआयआर' मोहिमेला (SIR Campaign) १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात सरासरी ७५ टक्के एसआयआर प्रक्रीया पूर्ण झाली असून मुंबई, ठाणेसारख्या भागातील डिजिटायझेशनचे प्रमाण ५० टक्केंच्या आसपास आहे. या पार्श्वभूमीवर या प्रक्रीयेला मुदतवाढ देण्याची विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. (SIR Campaign)



केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या सुधारित वेळापत्रकाची घोषणा केली. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या विनंतीची दखल घेत आयोगाने ही मुदतवाढ आणि नवीन वेळापत्रक मंजूर केले आहे. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (SIR Campaign)


सुधारित कार्यक्रमानुसार, १७ ऑगस्टपर्यंत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण करतील. त्याच दिवशी मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम पार पडेल. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी जाहीर केली जाईल. या मसुदा यादीवर नागरिकांना, राजकीय पक्षांना आपले दावे आणि हरकती २३ सप्टेंबरपर्यंत नोंदवता येतील. (SIR Campaign)



प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकतींची सुनावणी घेऊन ते निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केली जाईल. यानंतर सर्व आवश्यक दुरुस्त्या, नव्या मतदारांची नोंदणी आणि दुबार अथवा मृत मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करून २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (SIR Campaign)

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे