Nitesh Rane : मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही कृषी विद्यापीठाने विभागाकडे सादर करावा असे निर्देश



मुंबई : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मत्स्य नवीन मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या समवेत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी  उपस्थित होते. मंत्रालयात आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर ता.देवगड  व देवगड येथे मत्स्य महाविद्यालय  स्थापन करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती .



मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय स्थापनेच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मत्स्य व्यवसाय शिक्षणाचा विस्तार, उपलब्ध जागेचा वापर, आवश्यक पदनिर्मिती, नवीन इमारतीसाठी जमीन उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक निधीची तरतूद या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.



यावेळी कृषिमंत्री श्री. भरणे यांनी रामेश्वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही  कृषी विद्यापीठाने विभागाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले. या प्रयोगशाळेमुळे कोकणातील आंबा व अन्य फळपिकांच्या गुणवत्तेचे वैज्ञानिक परीक्षण स्थानिक स्तरावर होणार असून, निर्यातक्षम उत्पादनांना चालना मिळेल. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अवशेष तपासणीची सुविधा उपलब्ध होऊन कोकणातील आंब्याच्या निर्यातीला मोठी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म