Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता तांत्रिक कारणांमुळे खंडित होणार नाही. विहार तलावातील पाण्याचे येथीलच जलशुध्दीकरण प्रकल्पांतर्गत शुध्दीकरण करून पुरवठा करण्यात येते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे येथील वीज पुरवठा खंडित झाल्यास अनेक भागांमध्ये पाणी कपात करावी लागते. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारची तांत्रिक कपात टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने विहार जलशुद्धीकरण केंद्र, आरे रोड, पवई येथे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा स्त्रोत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.



विहार जलशुध्दीकरण केंद्राचे नूतनीकरण सन २०१९ साली करण्यात आ याठिकाणी पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन (स्काडा) प्रणाली पीएलसी प्रणाली, विदयुत हरिनीकरण इलेक्ट्रोक्लोरिनेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केलेला आहे. विहार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये २२ केव्हीए इतक्या परिमाणाचा समर्पित वीज पुरवठा एनआयटीआयई व नवल डॉकयार्ड या उपकेंद्रामार्फत अखंडित परिचलनाकरिता देण्यात आलेला आहे. विहार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये २२ केव्हीए इतक्या परिमाणाचा समर्पित वीज पुरवठा असूनदेखील याठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. मागील १८ जून २०२५ रोजी हा पुरवठा १२ तासाहून अधिक काळ खंडित झाला होता. दुर्देवाने, त्यादिवशी पर्यायी वीज पुरवठाही तांत्रिक कारणामुळे खंडित होता. त्यानंतर, हा वीज पुरवठा काही तासानंतर तांत्रिकी दुरुस्ती करुन नियमित करण्यात आला. परंतु नेवल डॉकयार्ड या उपकेंद्रामार्फत येणारा समर्पित वीज पुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे सध्यपरिस्थितीत विहार जलशुद्धीकरण केंद्रास एकाच उपकेंद्रामार्फत वीज पुरवठा असून भविष्यकाळात काही बिघाड झाल्यास कोणताही पर्यायी विज पुरवठा उपलब्ध नाही,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


या बिघाडामुळे विदयुत हरिणिकरण (इलेक्ट्रोक्लोरिनेशन) प्लांट या प्रणालीतील अतिसंवेदनशील विदयुत उपकरणे खराब झाली आहेत. अशा घटनांमुळे विदयुत पॅनेलमध्ये झालेल्या बिघाडामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा सतत कार्यरत असलेल्या ठिकाणी पर्यायी वीजपुरवठा स्त्रोत ही अत्यावश्यक बाब ठरते. त्यामुळे विहार जलशुद्धीकरण केंद्र, आरे रोड, पवई येथे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा स्त्रोत उपलब्ध करुन देण्याचे तसेच इतर संलग्न विद्युत, यांत्रिकी व स्थापत्यविषयक कामे करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासाठी आर जे इन्फोटेक या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी १कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा