Nashik : मनपाची ८४४ कोटींची थकबाकी; घरपट्टी-पाणीपट्टी न भरल्यास कायदेशीर व जप्तीची कारवाई करण्याचा इशारा

Nashik : नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) कर सवलत योजना राबवूनही शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टीची (Property tax and water charges) तब्बल ८४४ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप कायम आहे. विशेष म्हणजे ही थकीत रक्कम मनपाच्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या (Municipal Corporation's annual budget) तब्बल २५ टक्के इतकी आहे. चालू मागणी आणि मागील थकबाकी मिळून एकूण ९७४ कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान समोर असताना, कर संकलन विभागाला (Tax Collection Department) आतापर्यंत अवघे १३१ कोटी रुपयेच वसूल करण्यात यश आले आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर लवकरच जप्ती आणि कडक कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.



कर सवलत योजनेला संथ प्रतिसाद


एप्रिल ते जून या कालावधीत महापालिकेने (Nashik Municipal Corporation) कर भरणाऱ्यांसाठी सवलत योजना लागू केली होती. मात्र या योजनेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मागील थकबाकी ७४९ कोटी रुपये आणि चालू वर्षाची २२५ कोटी रुपयांची मागणी अशा एकूण ९७४ कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान कर विभागासमोर आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने साडेतीनशे कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र आतापर्यंत केवळ १३१ कोटी रुपयांचीच वसुली झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी हे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असल्याने थकबाकीचा थेट परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता आहे.



पंचवटी विभागात सर्वाधिक थकबाकी


महापालिकेच्या सहाही विभागांची आकडेवारी पाहता पंचवटी विभागात सर्वाधिक थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही ज्या मिळकतदारांकडे घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम बाकी आहे, त्यांनी ती तातडीने भरावी. अन्यथा थकबाकीदारांवर लवकरच कडक कायदेशीर व जप्तीची कारवाई केली जाईल. असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे.



मनपाच्या वसुली मोहिमेला फटका


कर विभागातील १२३ कर्मचाऱ्यांना मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात गुंतवण्यात आले आहे. थकबाकीदारांवर जप्ती आणि दंडात्मक कारवायांची भीती दाखवून वसुलीचा वेग वाढवला जातो; मात्र कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे सध्या कडक कारवाई करणे शक्य झालेले नाही. याचा मोठा फटका पालिकेच्या वसुली मोहिमेला बसला आहे.


Comments
Add Comment

LPG Price Hike : सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवातच महागाईच्या झटक्याने झाली आहे. दूध आणि साखरेच्या दरानंतर आता व्यावसायिक LPG

DRI Gold Smuggling Seizure : DRI ची मोठी कारवाई! ६५ कोटींच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; ४२ किलोहून अधिक परदेशी सोने जप्त

नवी दिल्ली : देशभरात सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीविरोधातील कारवाईला वेग देत डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १