Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी विरोधकांशी चर्चेची पावले उचलली आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची संसदेतील कार्यालयात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सरकारकडून सहकार्य मागण्यात आले असून, हा एक 'विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न' असल्याचे सूत्रांनी सांगितले.



या बैठकीला काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा, गौरव गोगोई आणि के. सी. वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते. बैठकीत प्रस्तावित सीमांकन विधेयक आणि वादग्रस्त 'एफसीआरए' विधेयकासह सर्व प्रलंबित मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १० दिवसांत रिजिजू यांची गांधींसोबतची ही दुसरी भेट आहे. राहुल गांधींच्या भेटीनंतर रिजिजू यांनी गृहमंत्री अमित शाह यांचीही संसदेत भेट घेतली. या अधिवेशनात विरोधी पक्ष सातत्याने गृहमंत्र्यांच्या उपस्थितीची मागणी करत आहेत.



२० जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळांमुळे लोकसभेत एकदाही प्रश्नोत्तर काळ पूर्ण होऊ शकलेला नाही. गोंधळादरम्यानच आतापर्यंत ५ विधेयके विनाचर्चा संमत करण्यात आली आहेत. नीट प्रकरणातील आंदोलकांवर झालेल्या दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात आणि पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या निवेदनासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, एफसीआरए संसदेत चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी येईल, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात यावर सविस्तर बोलतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या १३ ऑगस्ट रोजी संपणार असलेल्या या अधिवेशनात विरोधकांशी संवाद साधून कामकाज सुरळीत चालवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण