Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, आता रेल्वे प्रवासातील गैरप्रकारांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. धूम्रपान, अनधिकृत प्रवेश, रेल्वेत फेरीवाला व्यवसाय, मद्यपान करून गोंधळ घालणे आणि प्रवासातील असुरक्षित प्रकारांना आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. (Central Railway New Rule)


मध्य रेल्वेने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना या सुधारित नियमांची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. सुधारित तरतुदींनुसार काही महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे आहेत.



रेल्वेत धूम्रपान केल्यास आता २ हजार रुपयांचा दंड :


रेल्वे कायद्याच्या कलम १६७ मध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी धूम्रपान केल्यास १०० रुपयांपर्यंत दंड होता. आता हा दंड वाढवून २ हजार रुपये करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित व्यक्तीचे तिकीट किंवा पास जप्त करून त्याला रेल्वे परिसरातून बाहेर काढले जाऊ शकते. दंड भरण्यास नकार दिल्यास न्यायालयाकडून ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.



मद्यपान आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई : कलम १४५ अंतर्गत मद्यपान करणे central raiकिंवा रेल्वे परिसरात उपद्रव निर्माण करणे यासाठी शिक्षेत बदल करण्यात आला आहे. (Central Railway New Rule)



नवीन नियमानुसार :


रेल्वे परिसरातून बाहेर काढणे, तिकीट किंवा पास जप्त करणे, २४ तासांपर्यंत साधा कारावास, १ हजार रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा, तसेच 'सामुदायिक सेवा'ची तरतूद करण्यात आली आहे. वारंवार उपद्रव करणाऱ्या व्यक्तींना ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.



अनधिकृत प्रवेशाला बसणार आळा :


कलम १४७ मध्येही बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या प्रवासी क्षेत्रात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना जागा सोडण्यास नकार दिल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. (Central Railway New Rule)


रेल्वे परिसराचा गैरवापर केल्यास: ३ महिन्यांपर्यंत कारावास, ५ हजार रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, कारवाईपूर्वी प्रथम ताकीद देण्याची तरतूद आहे.



रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्यास दंड :


रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणण्यासंदर्भातील कलम १४६ मध्येही सुधारणा करण्यात आली आहे. आता अशा प्रकारात: ३ महिन्यांपर्यंत कारावास, २ हजार ५०० रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. (Central Railway New Rule)



रेल्वे परिसरात अनधिकृतपणे फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे, कलम १४४ नुसार:


पहिल्या तीन उल्लंघनांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड, चौथ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी १ वर्षापर्यंत कारावास आणि ५ हजार रुपयांपर्यंत दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. धोकादायक वस्तू आणल्यास किमान १० हजारांचा दंड तर
रेल्वेत आक्षेपार्ह किंवा धोकादायक वस्तू बेकायदेशीरपणे आणल्यास कलम १६५ अंतर्गत कारवाई होणार आहे.



नव्या नियमानुसार:


किमान १० हजार रुपये दंड, संबंधित वस्तू जप्त किंवा हटवणे, नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. दंड न भरल्यास न्यायालयाकडून १ वर्षापर्यंत कारावास किंवा किमान १० हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिली जाऊ शकते. (Central Railway New Rule)



मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन :


मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे, आरक्षित जागांचा आदर करण्याचे आणि रेल्वे परिसरात शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी अनधिकृत प्रवेश, फेरीवाला व्यवसाय, धूम्रपान आणि इतर असुरक्षित प्रकार टाळून सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Central Railway New Rule)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने