BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ' मैदानासाठी 'सुधारित आणि स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरण' तयार करुन अंमलात आणण्याची मागणी आता नगरसेवकाकडून केली जात आहे. महापालिकेच्या महसूलात वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून आणि शहरातील क्रीडा सुविधा अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून ही मागणी होत आहे. सर्व मैदानांचे आरक्षण व शुल्क भरण्याची प्रक्रिया केवळ महानगरपालिकेच्या अधिकृत 'खेलो मुंबई' मोबाईल अनुप्रयोगाद्वारेच करण्यात यावी,अशीही सूचना त्यांनी केली आहे.



मुंबईतील भाजपचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. या मागणीमध्ये त्यांनी मुंबई शहरात 'कृत्रिम टर्फ' तसेच 'बॉक्स क्रिकेट' उभारण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. परंतु क्रीडा संस्कृतींना चालना मिळत असले तरी, विद्यमान नियमांतील त्रुटींमुळे काही ठिकाणी टर्फचा वापर 'खेळ' कमी आणि 'व्यावसायिक माफियागिरी' करण्यासाठी अधिक होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.



तिवाना यांच्या म्हणण्यानुसार यातील प्रमुख पळवाटा म्हणजे छतावर जाळी नसल्याचे कारण देऊन टर्फला व्यावसायिक करातून सूट मिळविणे, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या खेळांमुळे होणारे ध्वनी व प्रकाश प्रदूषण, सार्वजनिक शांततेचा भंग, पर्यावरणीय परिणाम, ठेकेदारांची मक्तेदारी आणि सर्वात भयंकर म्हणजे कृत्रिम टर्फमध्ये वापरल्या जाणाऱ्या विषारी रबर कणांमुळे होणारे कर्करोगासारखे आजार आणि पर्यावरणाचा हास होण्याचा संभाव्य धोका निर्माण होत आहे. कृत्रिम टर्फ संकल्पना राबविण्याकरिता 'निवासी भागातील सर्व कृत्रिम तृणपट्टी मैदानावर संरक्षणात्मक छत जाळी बसविणे बंधनकारक करण्यात यावे. कृत्रिम तृणप‌ट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य पर्यावरणपूर्वक व निर्धारित तांत्रिक निकषांनुसार असलेल्याची खात्री करण्यात यावी. महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरील कृत्रिम तृणपट्टी मैदानांच्या उत्पन्नामधील पारदर्शक महसूल वाटप प्रणाली लागू करण्यात यावी. सर्व मैदानांचे आरक्षण व शुल्क भरण्याची प्रक्रिया केवळ महानगरपालिकेच्या अधिकृत 'खेलो मुंबई' मोबाईल अनुप्रयोगाद्वारेच करण्यात यावी.



कोणत्याही प्रकारचे रोख व्यवहार प्रतिबंधित करण्यात यावेत. निवासी भागांतील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कृत्रिम तृणप‌ट्टी मैदानांच्या कार्यरत वेळा निश्चित करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ध्वनीप्रदूषण, प्रकाश प्रदूषण, वाहतूक व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, पर्यावरणीय निकषांच्या पालनाबाबत नियमित तपासणी व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी' अशा बाबींचा अंतर्भाव करणे आवश्यक असून यासाठीचे धोरण बनवण्यात यावे अशी मागणी तिवाना यांनी केली आहे. अशाप्रकारचे धोरण बनवल्यास यातून महापालिकेला मोठ्याप्रमाणात महसूल प्राप्त होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिवाना यांच्या मागणीला आता किती नगरसेवकांचे कोणत्या पक्षाचे किती समर्थन मिळते यावर सर्व अवलंबून आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा