Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राज्यभरात तब्बल १ हजार रोजगार मेळावे (Maharashtra Rojgar Melava 2026) आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. यावेळी रोजगार मेळाव्यांच्या नियोजनासह तरुणांपर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.



रोजगार मेळावे अधिक व्यापक करण्यावर भर :


मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) म्हणाले की, रोजगार मेळाव्यांची (Maharashtra Rojgar Melava 2026) माहिती जास्तीत जास्त गरजू युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. केवळ आयटीआय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले तरुण तसेच सामाजिक संस्थांशी संपर्क साधून या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे.


राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात रोजगार मेळाव्यांची माहिती पोहोचवण्यात येणार असून, युवकांना रोजगारासोबतच स्वरोजगाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे.



रोजगारापूर्वी मिळणार कौशल्य प्रशिक्षण :


मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी स्पष्ट केले की, केवळ रोजगार मेळावे घेऊन उपयोग होणार नाही, तर उमेदवारांना पूर्वतयारी आणि कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्यापूर्वी (Maharashtra Rojgar Melava 2026) उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.


या प्रशिक्षणाच्या पहिल्या आठवड्यात व्यक्तिमत्त्व विकास, शिष्टाचार (एटीकेट), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्य या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. तर दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अ‍ॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Maharashtra Rojgar Melava 2026)



निवडीचे प्रमाण वाढवण्याचा उद्देश :


योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास रोजगार मेळाव्यांमधील उमेदवारांच्या निवडीचे प्रमाण वाढेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय अधिकारी आणि प्रदेश समन्वय समितीने एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (Maharashtra Rojgar Melava 2026)


दरम्यान, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी रोजगार मेळाव्यांच्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली. समिती सदस्यांनीही रोजगार मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सूचना मांडल्या. (Maharashtra Rojgar Melava 2026)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.