Nashik : नाशिकचे ‘उधमाळ’ ठरणार पहिले आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय समुदाय' गाव

Nashik : पर्यटनाने समृद्ध असलेले , हिरवाईने नटलेले आणि अध्यात्मिक घटनांचा वारसा लाभलेल्या नाशिकला आता आणखी नवी ओळख प्राप्त होणार आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील ‘उधमाळ’ हे डार्कस्काय इंटरनॅशनल (DarkSky International) या संस्थेकडून प्रमाणित होणारे भारतातील पहिले ‘डार्क स्काय समुदाय’ (Dark Sky Community) गाव ठरणार आहे. या उपक्रमास आवश्यक निधीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.



खगोलशास्त्रज्ञांसाठी पर्वणी


‘उधमाळ’ ( Udhamal ) हे गाव नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana) तालुक्यात याठिकाणी वसलेले आहे. याठिकाणी ‘डार्क स्काय समुदाय’ (Dark Sky Community) होत असल्याने खगोलशास्त्रज्ञ यांच्यासाठी मोठी पर्वणी असणार आहे. तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र (Astronomy) आणि अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करणे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यासोबतच मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती विकसित करण्याच्या मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उधमाळचे नैसर्गिकरीत्या स्वच्छ आणि अंधारमय आकाश विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे.



४२.१४ लाख निधीस प्रशासकीय मान्यता


पेसा (PESA) कायद्यांतर्गत अंधारमय आकाशाचे संवर्धन आणि जबाबदार बाह्य प्रकाशयोजनांना प्रोत्साहन देणारा ठराव उधमाळ ग्रामसभेने मंजूर केला आहे. या ठरावाद्वारे प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी सुरक्षित, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रकाशयोजनांचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०२६-२७ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून रु. ४२.१४ लाख निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून जनजागृती कार्यक्रम, जबाबदार प्रकाशयोजना आणि रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन तसेच स्थानिक युवकांचे प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.



नैसर्गिक वारसा जपत शाश्वत उपजीविकेच्या संधी


दरम्यान, जिल्हा नियोजन समितीमार्फत पर्यटन विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांमध्ये खगोल पर्यटन (अ‍ॅस्ट्रो-टुरिझम) ही संकल्पना महत्त्वाची ठरणार असून, या उपक्रमामुळे उधमाळ व परिसरातील नागरिकांना नैसर्गिक वारसा जपत शाश्वत उपजीविकेच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाच्या प्रस्तावित ‘राज्य डार्क स्काय धोरणा’शी हा उपक्रम सुसंगत असून, रात्रीच्या आकाश संवर्धनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्हा राज्यात अग्रणी भूमिका बजावेल, असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा