Zeeshan Siddiqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पुत्र झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी

परदेशातून 'व्हॉइस नोट'द्वारे धमकीचा संदेश; पोलीस व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर


मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांना परदेशातून 'व्हॉइस नोट'द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या संदेशानंतर मुंबई पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून, झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी व वैयक्तिक सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.


बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार झिशान अख्तर याने परदेशातून ही ऑडिओ व्हॉइस नोट पाठवल्याचा संशय आहे. "तुझ्या बापाचा काटा मीच काढला होता, आता तुझा नंबर आहे. तू माझ्या प्रत्येक कारभारात मध्येच पडत आहेस. तुला क्राईम ब्रांचकडे जेवढ्या फेऱ्या मारायच्या आहेत तेवढ्या मार, तुझ्याविरोधात फतवाच जारी केला आहे. वडिलांच्या हत्येच्या वेळी तू नशिबाने वाचलास, पण या वेळी तुझा गेम निश्चित आहे!" अशी धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या व्हॉइस नोटची सत्यता पडताळण्यासाठी ती डिजिटल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवली आहे.



दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे (पूर्व) येथे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी असलेले त्यांचे जवळचे संबंधातून लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करत मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने आतापर्यंत २७ हून अधिक आरोपींविरुद्ध कठोर 'मकोका' कायद्यांतर्गत हजारो पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.




मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा धक्कादायक दावा


दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. दाऊद इब्राहिमशी असलेले कथित संबंध आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागाचा दावा करत अनमोल बिश्नोई याने बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांना ठार मारण्याचे आदेश दिले होते, असा दावा शिवकुमारने केला आहे. पुण्यात भंगाराचा व्यवसाय करताना प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांच्यामार्फत आपण बिश्नोई टोळीशी जोडलो गेलो आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून अनमोल बिश्नोईच्या संपर्कात राहून १५ लाख रुपयांच्या मोबदल्यात हा खून घडवून आणल्याचे त्याने कबूल केले आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर