Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मंगळवारी रात्री हा अपघात घडला असून या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत काही काळ वाहतूक रोखून धरली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. (Dhule Accident News )





नेमकं प्रकरण काय ?


मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शिरपूर-चोपडा मार्गावर (Shirpur-Chopda Road) दोन जिवलग मित्रांवर काळाने घाला घातला. भाटपुरा (ता. शिरपूर) येथील चेतन योगेश गुजर (वय २३) आणि कल्पेश नितीन गुजर (वय २५) हे दुचाकीवरून घरी परतत असताना जळगावहून शिरपूरकडे येणाऱ्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. (Dhule Accident News )


ही धडक इतकी भीषण होती की, बसने दुचाकीसह दोघांना सुमारे १० ते १५ फूट फरपटत नेले. त्यामुळे दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र (Highway Police Station) आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे (Shirpur City Police Station) पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांची समजूत काढून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचा पुढील तपास थाळनेर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी