Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकमुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे. कॉमनवेल्थ गेम्समधील (राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा) सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान अत्यंत संतापजनक अनुभवाला सामोरे जावे लागले. ठरलेली भेट असूनही तब्बल दोन ते अडीच तास ताटकळत ठेवावे लागल्याने अखेर हे दोघेही राज ठाकरे यांची भेट न घेताच माघारी परतले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित हे आपले प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यासह राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. परंतु, वेळ ठरलेली असतानाही त्यांना तब्बल अडीच तास बाहेरच बसवून ठेवण्यात आले. वेळेची विनाकारण उधळण झाल्याने आणि योग्य मान मिळत नसल्याचे पाहून प्रशिक्षक काळे आणि दिलीप गावित अत्यंत नाराज झाले. "भेट द्यायची नव्हती, तर मग बोलावले कशाला?" असा उद्विग्न सवाल उपस्थित करत त्यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.



दोघेही निघून जात असल्याचे लक्षात येताच उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु संतप्त झालेल्या गावित आणि काळे यांनी थांबण्यास स्पष्ट नकार दिला. मीडियाशी बोलताना प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी आपली तीव्र खंत व्यक्त केली. "राज ठाकरे हे मोठे नेते आहेत यात शंका नाही, मात्र आम्हीसुद्धा देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठे यश मिळवले आहे. देशाचा तिरंगा जगभरात उंचावणाऱ्या खेळाडूला अशा प्रकारे ताटकळत ठेवणे अत्यंत चुकीचे आहे," असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या दुर्घटनेमुळे क्रीडाप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, यावर आता मनसेकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात