Nashik Earthquake News : नाशिकच्या 'या' तालुक्यांमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik Earthquake News : नाशिकमधील सुरगाणा, कळवण आणि पेठ या तालुक्यांमध्ये गुरुवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरगाणा तालुक्यातील वाझुळपाडा, बोरगाव, सराड, घागबारी, हरणटेकडी, रोटी आणि शिंदे दिगरसह आसपासच्या परिसरात गुरुवारी दिवसभरात भूकंपाचे सलग पाच सौम्य धक्के (Earthquake Tremors) जाणवले आहे.



सुरगाण्यात पाच भूकंपाचे धक्के


सकाळी ५:४१ वाजता: ३.० रिश्टर स्केल


सकाळी ७:०९ वाजता: ३.० रिश्टर स्केल


सकाळी ८:५८ वाजता: २.७ रिश्टर स्केल


दुपारी २:५६ वाजता: २.८ रिश्टर स्केल


दुपारी ३:३८ वाजता: ३.६ रिश्टर स्केल (दिवसातील सर्वाधिक तीव्रतेचा धक्का)



कळवण, पेठही भूकंपाच्या धक्क्याने हादरले


तर कळवण तालुक्यातील (Kalwan) दळवट आणि पेठ तालुक्यातील (Peth) आसरबारी परिसरात दुपारी ३:३८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. सध्या या सर्व भागांमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सुदैवाने या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नसले, तरी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.



दिल्लीचे एनसीएस पथक नाशिकमध्ये 


दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भूकंपाची नेमकी तीव्रता, केंद्रबिंदू आणि त्यामागील तांत्रिक कारणांची सविस्तर तपासणी करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ((National Center for Seismology) दिल्ली येथील विशेष तज्ज्ञ पथक तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले आहे. हे पथक बाधित भागांची पाहणी करून आपला सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण