Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जोगेश्वरी (पश्चिम) येथील कॅप्टन सामंत मार्ग येथे बांधण्यात आलेल्या ओशिवरा प्रसूतीगृहाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या हस्ते बुधवारी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी संपन्न झाले. लोकार्पणानंतर हे प्रसूतीगृह तत्काळ नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आले.जोगेश्वरी (पश्चिम), आदर्श नगर, बेहराम बाग, गौतम नगर, शास्त्री नगर आदी परिसरातील हजारो नागरिकांना ओशिवरा प्रसूतीगृहाचा थेट लाभ होणार आहे. ( Oshiwara Maternity Hospital)


याप्रसंगी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशिला अनावरण करून ओशिवरा प्रसूतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी संपूर्ण इमारतीतील विविध कक्षांमध्ये उपलब्ध सेवा सुविधांची पाहणी केली तसेच माहिती जाणून घेतली. यावेळी स्थानिक आमदार हारून खान, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे, स्थानिक नगरसेवक रुपेश सावरकर, नगरसेवक विठ्ठल बंधिरे, नगरसेविका सुधा सिंग, परिमंडळ ४ च्या उपआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपआयुक्त शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, रुग्णालये पायाभूत सुविधा कक्षाचे उपप्रमुख अभियंता मनोज राणे तसेच स्थानिक नागरिक, डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Women Health)


यावेळी महापौर रितू तावडे यांनी भाषणात सांगितले की, “हे प्रसूतीगृह केवळ एक इमारत नसून सुरक्षित मातृत्व आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे. वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यास बाळंतपणातील बहुतांश धोके टाळता येतात. त्यामुळे स्थानिक स्तरावर अशा सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याची सर्वांगीण जबाबदारी पार पाडत असून महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवित आहे,” असे त्यांनी नमूद केले. गर्भवती माता व नवजात बालकांना त्यांच्या निवासस्थानाजवळ दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. महानगरपालिका नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ओशिवरा प्रसूतीगृह हे त्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे महापौर तावडे यांनी सांगितले. (Mumbai News)



ओशिवरा प्रसूतीगृहाची वैशिष्ट्ये


इमारत जीर्ण झाल्याने तेथील सेवा तात्पुरत्या स्वरूपात टोपीवाला प्रसूतीगृह येथे हलविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेस सुविधा भूखंड अंतर्गत प्राप्त झालेल्या जागेवर तळमजला + ३ मजली सुसज्ज इमारतीत नव्या ओशिवरा प्रसूतीगृहाची उभारणी करण्यात आली आहे. आधुनिक सुविधा असलेले हे प्रसूतीगृह आता पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. (Health)


नवीन प्रसूतीगृहामध्ये एकूण ५० रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ३४ रुग्णशय्या या स्त्रीरोग व प्रसूती विभागासाठी, १० रुग्णशय्या बालरोग विभागासाठी आणि ६ रुग्णशय्या विशेष नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी राखीव आहेत.


यासह सुसज्ज शस्त्रक्रिया गृह, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


या प्रसूतीगृहामार्फत स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सेवा, बालरोग सेवा, प्रसूती, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची देखभाल, नवजात शिशु सेवा, कुटुंब नियोजन, लसीकरण तसेच माता व बाल आरोग्य समुपदेशन अशा सर्वसमावेशक सेवा उपलब्ध होणार आहेत. एक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दोन स्त्रीरोग तज्ज्ञ, एक बालरोग तज्ज्ञ आणि प्रशिक्षित परिचारिकांची टीम २४ तास सेवा देणार आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात