Vasai : रुळावर उभा राहून ट्रेन अडवण्याचा प्रयत्न? वसई-नालासोपारा दरम्यान लोकल थांबली प्रवशांना सुटला घाम!

पालघर: वसई-नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. एका युवकाने अचानक लोकल ट्रेनसमोर रेल्वे रुळांवर उभे राहत गोंधळ घातल्याने काही काळ लोकल सेवा प्रभावित झाली. मोटरमनच्या सतर्कतेमुळे ट्रेन वेळेत थांबवण्यात आली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.


मिळालेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेन मार्गावर असताना संबंधित युवक हातात लाकडी दांडा घेऊन थेट रुळांवर उभा राहिला. मोटरमनने तातडीने ब्रेक लावत ट्रेन थांबवली. सुरुवातीला प्रवाशांना तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला. मात्र, नंतर ट्रेनसमोर एक युवक उभा असल्याचे दिसताच परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट झाले.



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाला रुळांवरून बाजूला होण्याची वारंवार विनंती करण्यात आली. मात्र, तो हटण्यास तयार नव्हता. त्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि अनेक लोकल गाड्या उशिराने धावल्या.


दरम्यान, एका प्रवाशाने धाडस दाखवत खाली उतरून त्या युवकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा प्रवासी युवकाला रुळांवरून बाजूला करताना दिसत आहे. व्हिडिओतील काही दृश्यांमध्ये त्याने युवकाला थप्पड मारल्याचेही दिसते. मात्र, या घटनेची अधिकृत पुष्टी रेल्वे प्रशासनाने केलेली नाही.


घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित युवकाला सुरक्षितपणे रुळांवरून बाहेर काढले. या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.


दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना रेल्वे रुळांवर उतरू नये, तसेच अनधिकृतपणे रुळ ओलांडणे टाळावे, असे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे स्वतःचा आणि इतर प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास