Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विहिरी, तलाव व झरे यांसारख्या पारंपरिक जलस्रोतांचे जतन आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सर्व जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजप नगरसेवक व मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे यांनी महापालिकेकडे ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.



वाढते शहरीकरण आणि भूजल पातळीतील घट यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सॅटेलाईट मॅपिंग च्या साहाय्याने जलस्रोतांचे सर्वेक्षण करून अचूक जीपीएस को-ऑर्डिनेट्स निश्चित केले जावेत, जीआयएस आधारित 'डिजिटल वॉटर मॅप' तयार करून सर्व विहिरी व तलावांची माहिती एका व्यासपीठावर आणावी आणि आयओटी सेन्सर्सद्वारे पाण्याच्या पातळीवर व गुणवत्तेवर २४ तास देखरेख ठेवण्यासाठी 'स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग डॅशबोर्ड' विकसित केला जावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.



या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बिगर-पिण्याच्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर वाढेल, भूजल पुनर्भरणाला चालना मिळेल आणि भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात स्थानिक पातळीवर पाण्याचा साठा तात्काळ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत नगरसेवक सीए प्रतीक कर्पे यांनी महापालिका आयुक्तांनी यावर त्वरित धोरण आखून अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म