Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Rain)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच कोकण आणि गोव्यातही काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. (Weather Update)

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शहराचे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (IMD)



8 ऑगस्ट रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. 9 ऑगस्टलाही या भागांमध्ये अशाच प्रकारचे हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Mumbai Rain)

दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानेही पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. जानेवारी 2026 पासून आतापर्यंत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून एकूण 1,698 अलर्ट जारी करण्यात आले आहेत. याशिवाय वीज पडणे, अतिवृष्टी आणि भूस्खलनासंदर्भात 285 विशेष इशारे देण्यात आले आहेत. ( Konkan Rain)

हवामान खात्याकडून मिळणाऱ्या पूर्वसूचना आणि रिअल-टाइम अलर्टच्या आधारे स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पूर आणि अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची मिळून 23 पथके राज्यातील संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत आणि बचावकार्य करण्यासाठी ही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. (Heavy Rain)

 
Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि