Jalgaon Crime : चारित्र्याचा संशय डोक्यात शिरला, नवऱ्यानं पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील वडगाव येथील एक महिला पतीकडून होत असलेल्या संशयाची शिकार ठरली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने थेट तिच्या अंगावर दारू ओतून चक्क पेटवून ठार मारण्याचा (Crime News) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी ( Pimpalgaon Hareshwar police ) संशयित आरोपी पती राजू किशोर तडवी याला अटक केली आहे.(Jalgaon Crime News)



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, राजू तडवी याच्या मनात त्याच्या पत्नीविषयी चारित्र्याचा संशय होता. त्याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या अंगावर दारू ओतून पेटती काडी फेकल्याने महिलेच्या कपड्यांनी पेट घेतला. (Jalgaon Crime News)



महिलेचा आरडाओरड ऐकून नागरिकांनी धाव घेत आग विझवली आणि महिलेला उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (Jalgaon Crime News)

Comments
Add Comment

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील