Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये वडाळाजवळ पुरुषाकडून महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकी, सहप्रवाशी ठरले मूकदर्शक!

मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'लोकल ट्रेन' (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. लोकल डब्यामध्ये किरकोळ कारणांवरून होणारे वाद आणि मारहाणीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच, आता वडाळा स्थानकाजवळ घडलेली एक संतापजनक घटना समोर आली आहे. लोकलमध्ये एका पुरुषाने महिलेला मारहाण करत बेल्ट काढून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


सीटवर झोपल्यावरून वाद; पट्टा काढून महिलेला धमकी





प्राथमिक माहितीनुसार, ही घटना वडाळा स्थानकाजवळून जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. लोकलमध्ये सीटवर झोपलेल्या एका महिलेसोबत संबंधित पुरुष प्रवाशाची बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या पुरुषाने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, स्वतःच्या कमरेचा बेल्ट (पट्टा) काढून त्याने महिलेला मारण्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.



आजूबाजूचे प्रवासी मात्र पाहतच राहिले:


या सर्व घटनेतील अत्यंत चीड आणणारी आणि धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा तो पुरुष महिलेला अमानुषपणे धमकावत मारहाण करत होता, तेव्हा डब्यात उपस्थित असलेले इतर सहप्रवाशी मात्र निव्वळ मूकदर्शक बनून हा प्रकार पाहत राहिले. एकाही प्रवाशाने पुढे होऊन त्या पुरुषाला रोखण्याचा किंवा त्या महिलेच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न केला नाही. या उदासीनतेबद्दल सोशल मीडियावर युजर्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


रेल्वे पोलिसांच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा:


हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अजून रेल्वे पोलीस (GRP) प्रशासनाकडून अधिकृत विधान किंवा स्पष्टीकरण आलेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करून संबंधित दोषी पुरुषाचा शोध घेतला जाईल आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने