Nashik Crime : रील्ससाठी हवेत गोळीबार अन् थेट तुरुंगाची वाट, 19 वर्षीय तरुणीला अटक

Nashik Crime : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील्स बनवण्याचं वेड आता किती धोकादायक ठरू शकतं, याचं धक्कादायक उदाहरण नाशिकमध्ये समोर आलं आहे. मित्राच्या सांगण्यावरून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करत त्याचा व्हिडिओ बनवणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) अटक केली आहे. (Nashik Crime News)



रील्ससाठी हवेत गोळीबार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील सराईत गुन्हेगार भूषण उर्फ स्वप्नील गोसावी याच्याकडे बेकायदेशीर गावठी कट्टा होता. १४ जुलैच्या रात्री त्याने हा कट्टा कोमल रामदास गायकवाड (Komal Ramdas Gaikwad) हिला दिला आणि हवेत गोळीबार करण्यास सांगितले. कोमलने कोणताही विचार न करता गोळीबार केला, तर भूषणने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये चित्रीत केला. (Nashik Crime News)



गुन्हा दाखल, तरुणीला अटक


या घटनेची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाल्यानंतर या घटनेचा तपास सुरू करण्यात आला. ५ ऑगस्ट रोजी कोमलला ताब्यात घेण्यात आले. तिचा मोबाइल तपासल्यानंतर हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ आढळून आला. पोलिसांनी विवो कंपनीचा सुमारे २० हजार रुपयांचा मोबाइल आणि चार जीबीचा पेनड्राइव्ह जप्त केला आहे. (Nashik Crime News)


या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने कोमलला पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित भूषण गोसावी यालाही गुन्हे शाखेच्या गुंडविरोधी पथकाने यापूर्वीच अटक केली आहे. (Nashik Crime News)



एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची शिक्षा


या घटनेने सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासातून वाढणाऱ्या धोकादायक प्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रील्सच्या मोहात अनेक तरुण-तरुणी बेकायदेशीर शस्त्रांसोबत व्हिडिओ बनवत आहेत, मात्र अशा कृत्यांचे परिणाम थेट गुन्हेगारीच्या दलदलीत ओढणारे ठरू शकतात. क्षणिक प्रसिद्धीच्या नादात घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो.

Comments
Add Comment

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.