Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालय आणि शहरातील काही मेट्रो स्थानकांना लक्ष्य करण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने व्यापक तपास मोहीम सुरू केली. कोणताही धोका टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. (Mumbai News)


मुंबई पोलिसांनी या ईमेलची गंभीर दखल घेत बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना घटनास्थळी पाचारण केले. महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो परिसरातील प्रत्येक भागाची बारकाईने तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संपूर्ण परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली. (Bomb Threat)



दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये BMC मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असल्याचे दिसून आले. तसेच पालिकेच्या इमारतीत अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी प्रत्येक मजल्यावर तपासणी करताना दिसत होते. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील हालचालींवरही लक्ष ठेवण्यात आले. (Mumbai Police)


प्राथमिक तपासात अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धमकीचा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला, याचा शोध सायबर आणि गुन्हे शाखेच्या मदतीने घेतला जात असून, ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Metro Station)


शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठिकाणी कडक सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती शेअर करू नये आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील माहितीनंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे. (Mumbai Breaking News)


Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी