Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्‍या जात आहे. या अंतर्गत २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम मंगळवारी ११ ऑगस्‍ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून ते बुधवारी १२ ऑगस्‍ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, मंगळवारी ११ ऑगस्‍ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून ते बुधवारी १२ ऑगस्‍ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागातील काही परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, तर संपूर्ण एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Water Supply Cut News)


या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Water Supply Cut News)



कमी दाबाने पाणी पुरवठा होणारा परिसर :


के दक्षिण विभाग : मंगळवार ११ ऑगस्ट २०२६ कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, मासळी बाजार (फिश मार्केट), घाटीवाडा, चकाला, पी ऍन्ड टी वसाहत ( दुपारी ०२ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल) कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड), मोगरापाडा (सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल) (Water Supply Cut News)


बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ -सहार गाव, सुतार पाखडी, कार्गो संकुल ( सकाळी ५ ते ८ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)



पाणी पुरवठा बंद रहाणारा परिसर :


एच पूर्व विभाग : मंगळवार ११ ऑगस्ट २०२६ ते १२ ऑगस्ट २०२६ - देशांतर्गत विमानतळ, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत, सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस, वांद्रे - कुर्ला संकुल वांद्रे (पूर्व ) येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. (Water Supply Cut News)


बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व), वांद्रे (पूर्व) भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.