Pressure Cooker : तुमच्याही घरात प्रेशर कुकर आहे तर सावध व्हा; या चुका करू नका!

स्वयंपाक झाल्यानंतर प्रेशर कुकर धुणे ही जवळपास प्रत्येक घरातील रोजची सवय असते. मात्र, कुकरचे झाकण आणि भांडे स्वच्छ करताना त्यातील रबर गॅस्केट (सीलिंग रिंग) अनेकदा दुर्लक्षित राहते. हा छोटासा भाग जर नियमित स्वच्छ केला नाही, तर त्यामध्ये अन्नाचे सूक्ष्म कण, तेलकटपणा आणि ओलावा साचून राहू शकतो. हीच जागा पुढे बुरशी आणि जिवाणू वाढण्यासाठी पोषक ठरू शकते.


रबर गॅस्केट नियमित स्वच्छ करणे का महत्त्वाचे?


प्रेशर कुकरचा रबर गॅस्केट प्रत्येक वापरानंतर स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडा करूनच पुन्हा बसवावा. याशिवाय आठवड्यातून किमान एकदा त्याची सखोल स्वच्छता करणेही आवश्यक आहे. त्यांच्या मते, गॅस्केटमध्ये डोळ्यांना न दिसणारे अन्नकण, तेल आणि ओलावा अडकून राहू शकतो. कालांतराने हेच घटक अस्वच्छता निर्माण करतात. अनेकजण कुकरचे भांडे नीट घासतात, पण झाकणातील रबर रिंगकडे लक्ष देत नाहीत. मात्र, वाफ आणि अन्नाच्या संपर्कात येणारा प्रत्येक भाग स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे.



गॅस्केट स्वच्छ करण्याची योग्य पद्धत :


कोमट पाणी आणि सौम्य डिशवॉश लिक्विड च्या मदतीने रबर गॅस्केट स्वछ करावे आणि स्वच्छ पाण्याने नीट धुऊन पूर्णपणे कोरडे झाल्यावरच पुन्हा झाकणात बसवावे. ओलसर अवस्थेत गॅस्केट पुन्हा बसवणे टाळावे. तीव्र रसायनांचा वापर करून गॅस्केट स्वच्छ करणे टाळावे.


या चुका करू नका:


वापरानंतर प्रेशर कुकरचे झाकण पूर्णपणे लॉक करून ठेवू नये. झाकण किंचित उघडे ठेवल्यास आतमध्ये राहिलेला ओलावा सहज बाहेर पडतो आणि बुरशी तयार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय अनेकजण गॅस्केटवर अन्नाचे अवशेष अनेक दिवस तसेच राहू देतात, किंवा फाटलेले गॅस्केटही वापरत राहतात. या सर्व सवयी टाळणे आवश्यक आहे.



अयोग्य गॅस्केट :


रबर गॅस्केटला भेगा पडल्या असतील, ते सैल झाले असेल किंवा झिजले असेल, तर ते त्वरित बदलणे गरजेचे आहे.यामुळे केवळ स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत नाही, तर प्रेशर कुकर योग्य दाब निर्माण करू शकत नाही. परिणामी कुकरच्या सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो.


आपण बाहेरचे अन्न खाताना स्वच्छतेबाबत जागरूक असतो, त्याचप्रमाणे स्वतःच्या स्वयंपाकघरातील छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या छोट्या सवयी अन्न सुरक्षित ठेवण्यास आणि कुटुंबाचे आरोग्य जपण्यास मोठी मदत करतात.

Comments
Add Comment

Skin Treatment : सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो देण्यासाठी 5 खास स्किन ट्रीटमेंट्स; जाणून घ्या कधी कराव्यात?

दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे

नवरा-बायको दोघेही कमावतात, तरी बचत शून्य? ‘या’ ४ चुका ठरतात कारणीभूत!

घरात नवरा बायको दोघेही कामाला जातायंत पण तरीदेखील महिन्याच्या शेवटी बचत होत नाहीय? याचं कारण फक्त जास्त खर्च

Legal Will: मृत्यूपत्र कसे बनवायचे? किती खर्च येतो, काय आहेत नियम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप...

मुंबई: सध्याच्या घडीला माणसाचा एका मिनिटाचाही भरोसा नाही. आयुष्यात काय अनपेक्षित घडेल हे कोणालाच माहीत नाही.

लग्नाच्या आधी की लग्नानंतर? Term Insurance केव्हा घ्यायचा! 99.9% लोकांना माहितीच नाही; आत्ताच जाणून घ्या

मुंबई: लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये आपण कपडे, दागिने, लग्नाचे ठिकाण, लग्नामध्ये जेवणासाठी कोणकोणता मेन्यू हवा आणि

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Phone Call Anxiety : फोन कॉल आला की वाढते धडधड? जाणून घ्या 'टेलिफोन अँग्झायटी'मागचं नेमकं कारण

फोन वाजला की स्क्रीनवरील नाव बघून अनेक जणांच्या मनात पहिल