'Joru Ka Ghulam' Director Arrested : "त्यांनी मला घरी बोलावलं आणि..."; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपावरून ‘जोरू का गुलाम’च्या दिग्दर्शकाला अटक

मुंबई : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाच्या ‘जोरू का गुलाम’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते शकील नूरानी (७३) यांना मुंबईतील मालवणी पोलिसांनी बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी अटक केली आहे. एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. ('Joru Ka Ghulam' Director Arrested)



चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने अभिनेत्रीला घरी बोलावल्याचा आरोप :


मिळालेल्या माहितीनुसार, आगामी चित्रपटाबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने शकील नूरानी यांनी अभिनेत्रीला आपल्या घरी बोलावले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीने तक्रारीत केला आहे. तक्रारीनुसार, अभिनेत्रीला कथितरित्या नशेचे पदार्थ देण्यात आले, तसेच तिचे व्हिडिओ बनवून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत नूरानी यांना अटक केली. ('Joru Ka Ghulam' Director Arrested)



कोणत्या कलमांखाली गुन्हा?


मालवणी पोलिसांनी BNS कलम ६४(२)(M), १२३, ३५१(२) आणि ८८ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. अटकेनंतर नूरानी यांना न्यायालयात हजर करण्यात आले. बोरिवली हॉलिडे कोर्टाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अभिनेत्रीने केलेल्या आरोपांची चौकशी केली जात आहे. ('Joru Ka Ghulam' Director Arrested)



कोण आहेत शकील नूरानी?


शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून परिचित आहेत. १९९०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे.
त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘बडे दिलवाला’ (१९९९) आणि ‘जोरू का गुलाम’ (२०००) यांचा समावेश आहे. ‘बडे दिलवाला’मध्ये सुनील शेट्टी, प्रिया गिल आणि परेश रावल यांनी भूमिका साकारल्या होत्या. तर ‘जोरू का गुलाम’मध्ये गोविंदा, ट्विंकल खन्ना, कादर खान आणि जॉनी लिव्हर हे प्रमुख कलाकार होते. ('Joru Ka Ghulam' Director Arrested)



दरम्यान, अभिनेत्रीने केलेल्या गंभीर आरोपांनंतर आणि दिग्दर्शकाच्या अटकेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलिसांच्या तपासानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे. ('Joru Ka Ghulam' Director Arrested)

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला