Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर सत्याचा विजय दर्शवणारा दिवस. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली, तर आदिशक्ती देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून शक्ती आणि विजयाचा संदेश दिला. याच विजय, संघर्ष आणि परिवर्तनाच्या विचारांना आधुनिक सामाजिक वास्तवाशी जोडणारा ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Dashmi Movie Poster Launch)


केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले असून, पोस्टरमधून संघर्ष, शक्ती आणि विजयाची झलक पाहायला मिळत आहे.



दमदार कलाकारांची फौज :


‘दशमी’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासोबत दाक्षिणात्य स्टार रवि प्रकाश यांचीही भूमिका आहे. (Dashmi Movie Poster Launch)



‘दशमी’ म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ :


चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले की, ‘दशमी’ हा केवळ चित्रपट नसून प्रत्येक व्यक्तीला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य देणारा विचार आहे. प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक कुटुंबाला आत्मविश्वास आणि बळ देणारी ही कथा असल्याचे त्यांनी सांगितले. विजयादशमीच्या पारंपरिक संकल्पनेला आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन न देता विचार करायला लावणारा आणि दीर्घकाळ लक्षात राहणारा अनुभव देण्याचा प्रयत्न असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले. (Dashmi Movie Poster Launch)



सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलरचा जबरदस्त तडका :


‘दशमी’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची भव्य दृश्यरचना आणि उच्च दर्जाचे तांत्रिक सादरीकरण. बॉलिवूड चित्रपटांच्या धर्तीवर मोठ्या पडद्याचा अनुभव लक्षात घेऊन चित्रपटातील प्रत्येक फ्रेम बारकाईने साकारण्यात आली आहे. चित्रपटाची कथा रहस्याच्या अनेक स्तरांनी विणलेली असून, कथानकातील गूढ धागे सहज उलगडत नाहीत. नवे प्रश्न, अनपेक्षित वळणं आणि धक्कादायक खुलासे यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Dashmi Movie Poster Launch)



मराठी सिनेमात सस्पेन्स-क्राईम थ्रिलरचा नवा प्रयोग :


चित्रपटाचे लेखन आणि संगीत सुरेश पंडित यांनी सांभाळले आहे. सामाजिक आशयासोबतच सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलरचा प्रभावी मिलाफ साधणारा ‘दशमी’ मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा अनुभव देण्याच्या तयारीत आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष, स्त्रीशक्ती, रहस्य आणि विजयाचा संदेश घेऊन ‘दशमी’ ऑक्टोबरमध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होणार असून, या चित्रपटाकडे आता मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (Dashmi Movie Poster Launch)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’