Nashik News : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय; नैताळे-देवगाव रस्त्यासाठी 20 कोटींची मंजुरी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नैताळे-देवगाव रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सुमारे 20 कोटी रुपये खर्चाच्या या कामामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित आणि सोयीचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. (Nashik)



नैताळे-देवगाव हा मार्ग नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला देवगाव फाटा, सावळीविहीर आणि शिर्डीला जोडतो. गुजरातमधून शिर्डीकडे जाणाऱ्या अनेक पायी दिंड्यांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी दरम्यान वाढणारी वाहतूक लक्षात घेता या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. (Chhagan Bhujbal)


सध्या या रस्त्याची रुंदी केवळ 3.75 मीटर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक झाल्यास वाहनचालक आणि भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या वर्षभरात या मार्गावर 22 अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. (Kumbh Mela 2027)


दरम्यान, नाशिक-निफाड-येवला मार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच भरवस फाटा ते सावळीविहीरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणही सुरू आहे. या कामांना नैताळे-देवगाव रस्त्याची जोड मिळाल्याने नाशिक ते शिर्डी दरम्यानचा पर्यायी मार्ग अधिक सक्षम होणार आहे.


सिंहस्थ कुंभमेळा निधीतून या रस्त्याचे काम करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने आगामी कुंभमेळ्यात वाहतूक व्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय नाशिक, निफाड, येवला आणि शिर्डी परिसरातील नागरिकांसाठीही हा सुधारित मार्ग उपयुक्त ठरणार आहे. (Shirdi News)


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण