Beed District Administration's Report : महसूल मंत्री बावनकुळेंच्या सूचनेवरून एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेले नाही; बीड जिल्हा प्रशासनाचा अहवाल

मनोज जरांगे पाटील यांचे दावे तथ्यहीन



मुंबई : बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलेले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा खुलासा बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या चौकशी अहवालात केला आहे.


अहवालात म्हटले आहे की, माजलगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ अंतर्गत 'नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)' या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविका श्रीमती रेखा अंकुशराव अंबुरे यांनी मौजे खळवट लिमगाव (ता. वडवणी) येथील कुणबी नोंद असलेला ‘नमुना-३३’ जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून, अर्जदारांचे प्रतिज्ञापत्र व शपथपत्र नोंदवून घेतले. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर २४ जून २०२६ रोजी हा 'नमुना-३३' जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर यशस्वीरीत्या अपलोड करण्यात आला असून या स्तरावर कोणतेही कागदपत्र प्रलंबित नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



दरम्यान, माजलगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुमन माणिकराव मुंडे यांनी १ मे २०२६ रोजी महसूल मंत्र्यांकडे या प्रकरणी एक अर्ज सादर केला होता. महसूल मंत्र्यांनी या अर्जावर केवळ चौकशी करावी, अशा स्वरूपाचा शेरा देऊन तो अर्ज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना, "महसूल मंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत सूचना दिल्या आहेत", असा आरोप केला होता. प्रशासनाच्या अहवालाने जरांगे पाटलांचा दावा तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले.



अहवालात काय?


Beed district administration's report

 

  • बीड जिल्ह्यातील कोणतेही कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही.

  • महसूल मंत्र्यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रार अर्जावर चौकशीचे निर्देश दिले होते; प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले नव्हते.

  • रेखा अंबुरे यांच्या अर्जानुसार भूमी अभिलेख चौकशीअंती २४ जून २०२६ रोजी 'नमुना-३३' संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.

  • बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्वाक्षरी केलेला हा अहवाल महसूल मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या