AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेन्नईतील काठीपारा फ्लायओव्हरवर आमीनच्या पॉर्श कारची दुसऱ्या वाहनाला धडक झाली. या अपघातात आमीन आणि त्याचा मित्र सुदैवाने बचावले असून, दोघांनाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आमीन आपल्या मित्रासोबत पॉर्श कारने कोयंबेडूच्या दिशेने जात होता. काठीपारा फ्लायओव्हरजवळ पोहोचताच बाजूच्या रस्त्यावरून एक वॅगन-आर अचानक मुख्य मार्गावर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही वाहनांची धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. (A R Rahman Son Accident)



घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी आमीन व त्याच्या मित्राला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांची तपासणी केली. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नसून, किरकोळ दुखापतींवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. एअरबॅग आणि कारमधील सुरक्षा यंत्रणांमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. (Accident News)


दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच ए.आर. रहमान यांच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, आमीन सुखरूप असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. अपघातप्रकरणी पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. (Bollywood News)


ए.आर. आमीनने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली आहे. मणिरत्नम यांच्या ‘ओ कधल कनमनी’ या चित्रपटातील ‘मौला सल्ली’ या गाण्याद्वारे त्याने पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो विविध संगीत कार्यक्रमांमध्ये ए.आर. रहमान यांच्यासोबत परफॉर्म करताना दिसला आहे.


दरम्यान, ए.आर. रहमान सध्या ‘रामायण’सह आगामी काही महत्त्वाच्या चित्रपटांच्या संगीतावर काम करत आहेत. त्यांच्या मुलाच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहते आमीनच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवून आहेत. (Chennai Accident)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’