FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत मालाड पश्चिम येथील ब्लिंकिटच्या (Blinkit) गोदामाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान गोदामात झुरळांचा वावर, अत्यंत अस्वच्छ वातावरण, गंजलेल्या रॅक्सवर आणि जमिनीवर ठेवलेले अन्नपदार्थ, तसेच मुदतबाह्य व खराब पॅकेजिंग असलेला साठा आढळल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली. (FDA Action on Blinkit)



ब्लिंकिटच्या गोदामात धक्कादायक वास्तव :


एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे अनेक गंभीर उल्लंघन समोर आले. गोदामातील कोल्ड स्टोरेजची स्वच्छता अपुरी असल्याचे, कीटक व उंदरांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना नसल्याचे आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व आरोग्य नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले. (FDA Action on Blinkit)



तसेच कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वैयक्तिक स्वच्छता साहित्य आणि संरक्षणात्मक साधनांचाही अभाव होता. या सर्व त्रुटींमुळे ब्लिंक कॉमर्स प्रा. लि. (ब्लिंकिट) चा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. एफडीएने स्पष्ट केले आहे की, निलंबन कालावधीत या गोदामातून कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची विक्री, वितरण किंवा अन्न व्यवसाय सुरू ठेवण्यास सक्त मनाई असेल. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. (FDA Action on Blinkit)



काजू कतलीमध्ये बुरशी आणि अळ्या; रिलायन्स रिटेलवरही कारवाई :


दरम्यान, बुलढाणा येथे रिलायन्स रिटेल लिमिटेड च्या आस्थापनेत ‘लक्ष्मी नारायण’ ब्रँडच्या काजू कतलीमध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर एफडीएने तातडीने तपासणी केली. तक्रारीतील संबंधित बॅच उपलब्ध नसली तरी त्याच उत्पादनाच्या दुसऱ्या बॅचमधील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यावेळी सुमारे ११.३४० किलो वजनाचे ५४ बॉक्स, अंदाजे १० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. (FDA Action on Blinkit)



पालघर, ठाणे आणि नवी मुंबईतही धाडसत्र :


एफडीएची कारवाई केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून पालघर, ठाणे आणि नवी मुंबईतही अनेक आस्थापनांवर धाड टाकण्यात आली. उल्हासनगर आणि वसई पूर्व येथे निकृष्ट दर्जाचे पनीर, खाद्यतेल आणि मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. (FDA Action on Blinkit)



उल्हासनगर: ३४,६५० रुपयांचे ९९ किलो लो-फॅट पनीर जप्त
दुसरी कारवाई: १८,५६० रुपयांचे ६४ किलो लो-फॅट पनीर जप्त
वसई पूर्व: ४८,९६० रुपयांचे १५३ किलो मानकांनुसार नसलेले पनीर जप्त



राज्यभर मोहीम सुरूच :


अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील अन्न व्यवसायिकांना स्वच्छता, साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही एफडीएने दिला आहे. (FDA Action on Blinkit)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा