Bharat Gogawale : १५ ऑगस्टला रायगडमध्ये मीच झेंडा फडकवणार!

- मंत्री भरत गोगावले; येत्या २४ तासांत पालकमंत्री म्हणून घोषणा होणार असल्याचा दावा


मुंबई : महायुती सरकारमध्ये गेल्या पावणेदोन वर्षांपासून सुरू असलेला रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पदासाठी आग्रही असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी येत्या २४ तासांत आपल्या नावाची घोषणा केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच १५ ऑगस्ट रोजी रायगडचा पालकमंत्री म्हणून आपणच शासकीय ध्वजारोहण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दीर्घ काळ उलटला असला, तरी रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटू शकला नव्हता. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरू होती. मात्र, मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये यावर सविस्तर चर्चा होऊन तोडगा काढण्यात आल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, वरिष्ठ पातळीवर चर्चा पूर्ण झाली असून आपले नाव निश्चित करण्यात आले आहे, त्यामुळे आता अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.


रायगड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. सुनील तटकरे यांनी आपली कन्या आदिती तटकरे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्रिपद राहावे यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती, तर दुसरीकडे शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी स्थानिक वर्चस्वासाठी हे पद गोगावले यांच्याकडे राहावे असा आग्रह धरला होता. या परस्परविरोधी भूमिकांमुळेच आजवर हा निर्णय रखडला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत याबाबत तडजोड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


त्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना आमदार करण्यासाठी शिवसेनेने माघार घेतली होती. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला होता. त्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेला देण्याचे पडद्यामागे ठरले होते. त्याची अंमलबजावणी आता होताना दिसत आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार