मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबई येथील हवामान विभागाच्या केंद्राने आज, 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता पुढील 3 तासांसाठी काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार पावसाचा जोर अचानक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Rain Update)
पुणे आणि नाशिकच्या घाट भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पावसामुळे घाटातील रस्त्यांवर पाणी साचणे, रस्ता खचणे किंवा दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनचालकांनी वेग कमी ठेवून आणि सुरक्षित अंतर राखून प्रवास करावा. (IMD Alert)
दरम्यान, पुढील काही तासांमध्ये स्थानिक पातळीवर पावसाची तीव्रता बदलू शकते. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि आवश्यक असल्यासच प्रवास करावा. हवामान विभागाकडून मिळणाऱ्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (Mumbai Monsoon)
राज्यातील इतर भागांमध्येही स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरातील हवामानाची स्थिती तपासूनच पुढील नियोजन करावे. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Update)






