Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्प हाती घेण्यात येत असून या प्रकल्प कामाच्या प्रस्तावाला काही दिवसांपूर्वीच मान्यता दिल्यानंतर आता या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे. या कामासाठी मेक्सिकोतील धरणांचे काम पाहणाऱ्या आणि मेट्रो रेल्वेच्या काम पाहणाऱ्या कंपनीची निवड करण्यात येत आहे. या कामासाठी आयेसा इंडिया प्रा.लि. व चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी विविध करांसह २४ कोटी रुपये अदा करण्यात येणार आहे. (Gargai Water Project)


"मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या जलतज्ञ डॉ.एम.ए.चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या तज्ञ समितीच्या शिफारशींनुसार, मुंबई महानगरपालिकेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा प्रकल्पाच्या यशस्वी पुर्ततेनंतर, गारगाई पाणी पुरवठा प्रकल्प विकसित करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. या प्रकल्पाची प्राथमिक अभियांत्रिकीची कामे प्रगतिपथावर आहेत. गारगाई प्रकल्प महानगरपालिकेतर्फे विकसित करण्यास परवानगी मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी ४४० दशलक्ष लिटर एवढी वाढ होणार आहे. (Gargai Water Project)



हा गारगाई प्रकल्प पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर होणार आहे. या प्रकल्पांतर्गत, गारगाई नदीवर ६९ मी. उंचीचे, ९७९.४ मी. लांबीचे धरण बांधणे, आदान मनो-याचे बांधकाम तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान सुमारे १.६ कि.मी. लांबीच्या जलवहन बोगद्याचे बांधकाम, मुख्यतः जलविद्युत जनित्र बुडीत क्षेत्रातील सर्व वृक्षांचे प्रत्यारोपण, पुनर्वसनाकरिताच्या पायाभूत सुविधांचा विकास या कामांचा मुख्यतः अंतर्भाव आहे. गारगाई जलाशयातून पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर जलाशयात आणून पुढे गुरुत्वीय पध्दतीने अस्तित्वात असलेल्या जलवहन व्यवस्थेद्वारे मुंबई शहरास पुरविण्यात येणार आहे. यासाठीची संपूर्ण जलवहन व्यवस्था, जलप्रकियाआणि उदंचन केंद्र यांचे बांधकाम मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. (Gargai Water Project)


गारगाई धरण व बोगदा प्रकल्पासाठी सविस्तर अभियांत्रिकी व बांधकामासाठी सोमा एंटरप्राईज लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गारगाई प्रकल्पांतर्गत गारगाई नदीवर लोटन संहत संधानक या तंत्रज्ञानावर आधारित धरण बांधण्यात येणार असून, गारगाई प्रकल्पाच्या प्राथमिक अभियांत्रिकीची कामांना सुरुवात झाली असून आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भारतामध्ये या तंत्रज्ञानावर आधारित मोजकीच धरणे बांधण्यात आल्यामुळे सल्लागार सेवेच्या निविदा मागविण्यात आल्या. (Gargai Water Project)



या कामांसाठी आयेसा इंडिया प्रा.लि. व मे. चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि. या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली आहे. आयेसा इंडिया प्रा.लि. ही मॅक्सीको येथील मे. आयेसा इंजिनेरिया वाय. आरक्विटेकटूरा एस.ए. या मूळ संस्थेची ती उपकंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय हे नोएडा, उत्तरप्रदेश येथील आहे. तसेच चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. यांचे कार्यालय अंधेरी येथे आहे. आयेसा इंडिया प्रा.लि. यांनी मॅक्सीकोतील ३६ मी. उंचीच्या एल पोरगातोरिओ अपवाहन धरण तसेच मॅक्सीकोतील गुवानुआणतो येथील १३३ मी. उंचीच्या झापोटील्लो धरणप्रकल्प अश्या २ धरणाचे (आरसीसी तंत्रज्ञानाद्वारे) बांधकामाचे पर्यवेक्षण तसेच सविस्तर अभियांत्रिकी काम पार पाडले आहे. (Gargai Water Project)

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म