Nashik Crime News : बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Nashik Crime News : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील दोडी बु. येथे चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह नारळाच्या बागेतील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संगीता मधुकर जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तींनी संगीता यांचा गळा आवळून आणि पाय बांधून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Nashik Crime News)



बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला


७ ऑगस्ट पासून संगीता या बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी संगीता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता, सोबतच घरी कुलूप असल्याचे आढळल्यानंतर नातेवाईकांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. संगीता यांचा शोध लागत नसल्याने अखेर नातेवाईकांनी ८ ऑगस्ट रोजी नांदूर शिंगोटे पोलीस चौकीत संगीता जाधव बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी नातेवाईकांनी दोडी बु. परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना नारळाच्या बागेतील विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. (Nashik Crime News)



गुन्हा दाखल, तपास सुरू


पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. धक्कादायक म्हणजे, मृतदेहाच्या गळ्याला काळ्या रंगाच्या साडीने गाठ मारलेली होती आणि त्याच साडीने पायही बांधलेले आढळले. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अधिक बळावला आहे. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्यापूर्वीच्या कालावधीत अज्ञात आरोपींनी संगीता जाधव यांना सोबत नेऊन त्यांचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची फिर्याद त्यांच्या बहिणी सुनिता वाकचौरे यांनी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास