BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा करणाऱ्या गोलंजी टेकडी जलाशयाचे बांधकाम जुने झाले असून ही टाकी तोडून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. सध्या या जलाशयाची साठवण क्षमता ६.७५ दशलक्ष लिटर्स एवढी आहे. ही क्षमता आता नवीन पुनर्बांधणीमध्ये याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स एवढी केली जाणार आहे. (BMC News)



मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील विविध भागात गोलंजी टेकडी जलाशय मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गोलंजी टेकडी जलाशय हे सन १९६५ मध्ये बांधलेला असुन त्याची पाण्याची साठवण क्षमता ६.७५ दशलक्ष लिटर्स आहे. या जलाशयाचे बांधकाम ६० वर्ष जुना असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने स्ट्रक्चरल ऑडीट केले. या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालात या जलाशयाची पुर्नबांधणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार जलअभियंता विभागाच्यावतीने याची पुनर्बांधणी करण्याकरता निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये जी. आर. कंस्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याकरता विविध करांसह १६.०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (BMC News)



जलअभियंता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या जलाशयाची पुनर्बांधणी ही पुढील २०५१ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा विचार करून केली जाणार आहे. त्यामुळे नव्याने जलाशयाचे बांधकाम करताना याची एकूण क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स एवढी केली जाणार आहे. (BMC News)



जलाशयाच्या बांधकामांत कोणत्या गोष्टींचा असेल अंतर्भाव :


-विद्यमान जलाशयाचा एक कप्पा तोडणे
-जलाशयाच्या एका कप्प्याचे बांधकाम करणे.
-बांधकाम जलरोधक प्रक्रिया करणे.
- जलाशयाच्या आतील भागाला निर्विष खाद्य दर्जाचे रंगकाम करणे.
-जलाशयाच्या बाहेरील भिंती, जिना व कठडे इत्यादींना बाहेरून रंगकाम करणे.
-आगमन व निर्गमन पाईपांचा पुरवठा, स्थापना व जोडणी विद्यमान जाळयाशी करणे.
- स्कोर वॉल्य, बटरफ्लाय वॉल्य, स्लुइस वॉल्व काढून टाकणे आणि यांत्रिकी व विद्युत संबंधित अनुषंगिक कामे करणे.
- स्लुइस वॉल्व, बटरफ्लाय वॉल्व बसविणे चाचणी करणे आणि कार्यान्वित करणे व यांत्रिकी व विद्युत संबंधित कप्प्याचे अनुषंगिक कामे करणे.
-नव्याने बांधलेल्या कप्प्याची हायड्रॉलिक चाचणी करणे.
- पहिल्या कप्प्याप्रमाणेच दुसरा कप्पा तोडून पुनर्बाधणी करणे.
-जलाशयाच्या परिघावर आणि रस्त्यालगत पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करणे आणि विद्यमान चेंबरशी त्याची जोडणी करणे.
-बाह्य जिन्याचे बांधकाम करणे.
- रस्त्याची दुरुस्ती व अनुषंगिक कामे करणे. (BMC News)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने