Nashik : चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटीकरण झालेला रस्ता पुन्हा फोडला, नाशिक महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Nashik : नाशिक शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान (CBS to Canada Corner) अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता पुन्हा फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पायाभूत सुविधांसाठी पुन्हा रस्ते फोडावे लागणार नसल्याचा महापालिकेचा (Nashik Municipal Corporation) दावा अल्पावधीत फोल ठरला आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या कामासाठी हा रस्ता फोडला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी आक्षेप घेत काम थांबवले.


कुलकर्णी गार्डनजवळ रस्ता फोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच डॉ. पाटील (Dr. Hemlata Patil) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी मजुरांकडे चौकशी केली असता, संबंधित काम हे फारूख नावाच्या ठेकेदारामार्फत सुरू असल्याचे सांगण्यात आले. स्मार्ट सिटी कंपनीच्या (Smart City Company) कामासाठी रस्त्यावर ढापे करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही समोर आली.



वारंवार रस्त्यांचे खोदकाम


विशेष म्हणजे, या कामाच्या ठिकाणी महापालिका किंवा स्मार्ट सिटीचा कोणताही अभियंता उपस्थित नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे नवीन रस्ता तयार करण्यापूर्वी विविध युटिलिटींचे नियोजन नेमके का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यातच गॅस पाइपलाइन, जलवाहिनी आणि फायबर ऑप्टिकलसह इतर सुविधांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.



नाशिक महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह


महापालिकेकडून नवीन रस्ते तयार करताना भविष्यात रस्ते पुन्हा फोडण्याची गरज पडू नये, यासाठी युटिलिटीची व्यवस्था करण्यात येत असल्याचा दावा केला जातो. मात्र, सीबीएस-कॅनडा कॉर्नर मार्गावरील प्रकारामुळे या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता पुन्हा फोडल्याने नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप डॉ. हेमलता पाटील यांनी केला आहे. त्यांनी रस्ता फोडण्याचे काम थांबवत खोदलेल्या ठिकाणी माती टाकली. या कामाची चौकशी करावी, आयुक्तांची लेखी परवानगी असल्याशिवाय ते काम पुन्हा सुरू करू नये, फोडलेला रस्ता स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराकडून दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.



विकास की नागरिकांच्या पैशांचा अपव्यय


रस्ता काँक्रीट करण्याआधी सीसीटीव्हीच्या ढाप्यांचे (युटिलिटी) नियोजन का झाले नाही, चार महिन्यांपूर्वी तयार केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ का आली, कामाच्या ठिकाणी मनपा किंवा स्मार्ट सिटीचा अभियंता का नव्हता आणि या सर्व नियोजनाच्या अभावाची जबाबदारी नेमकी कोणाची, असे प्रश्न डॉ. हेमलता पाटील यांनी केले. नागरिकांच्या पैशातून रस्ते करायचे, काही महिन्यांत ते पुन्हा फोडायचे आणि पुन्हा त्याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च करायचा याकडे लक्ष वेधत त्यांनी हा विकास आहे की नागरिकांच्या पैशांचा अपव्यय, असाही प्रश्न केला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण