Ghatkopar Landslide : धक्कादायक! घाटकोपर परिसरात गौशिया चाळीजवळ दरड कोसळली; दोघांचा मृत्यू तर ३ ते ४ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच कुर्ला परिसरातून मोठी आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. घाटकोपर मधील चिराग नगर भागातील गौशिया चाळीजवळ बुधवारी (१२ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास अचानक दरड कोसळली. डोंगराचा मोठा भाग खचल्याने माती आणि दगडांचा ढिगारा चाळीतील घरांवर कोसळला. या ढिगाऱ्याखाली ४ ते ५ नागरिक अडकल्याची प्राथमिक भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Ghatkopar Landslide)


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे ३ वाजून ४८ मिनिटांनी घडली. कुर्ल्यातील रठोड मेडिकलजवळ असलेल्या गौशिया चाळीच्या मागील बाजूस डोंगराचा भाग अचानक खचला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड खाली असलेल्या घरांवर येऊन पडले. (Ghatkopar Landslide)



अग्निशमन दलासह अनेक यंत्रणा घटनास्थळी :


घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस, महापालिकेच्या एल-वॉर्डचे कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका तसेच संबंधित वीज वितरण कंपनीचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पाऊस आणि अंधारामुळे सुरुवातीला बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर बचाव पथके नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. (Ghatkopar Landslide)





दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराळ आणि दरडप्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. (Ghatkopar Landslide)

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या