Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. योगेश एकनाथ नेमाडे (वय ३५, रा. ईश्वर कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे असून सुसाईड नोट मध्ये त्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. ही घटना सोमवारी एमआयडीसी परिसरातील म्हाळसाई इरिगेशन कंपनीत घडलीय. या घटनेनं कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. (Jalgaon Crime News)



नेमकं काय घडलं ?


औद्योगिक वसाहत परिसरात योगेश नेमाडे व त्यांचा भाऊ मयूर नेमाडे यांची म्हाळसाई इरिगेशन नावाची कंपनी आहे. सोमवारी योगेश यांनी याच कंपनीत गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या भावाच्या लक्षात आला त्यांनी तात्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. (Jalgaon Crime News)



कंटाळा आला आता, आता मी निघतो


आत्महत्येपूर्वी योगेश नेमाडे यांनी सुसाईड नोट लिहिली. त्यात त्यांनी उधारीचा उल्लेख करीत समोरील व्यक्तीने फसविले असून, ‘कंटाळा आला आहे, आता मी निघतो’, असे म्हटले आहे. सुसाईड नोटमधील उल्लेखानुसार या कंपनीकडून राजस्थानमधील धार जिल्ह्यातील राजोद येथील एका फर्मने माल घेतला होता. त्याचे ७ लाख रुपये त्यांच्याकडून येणे बाकी होते. वारंवार कॉल करूनही पैसे मिळत नसल्याचे योगेश यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. औद्योगीक वसाहत पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.



संपत्तीच्या हव्यासातून भावजयीचा खून


दरम्यान, दुसरीकडे संपत्ती आणि विम्याच्या पैशांच्या हव्यासापोटी सख्ख्या भावजयीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या दिराला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दीपक लोटन सोनार असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने त्याला जन्मठेपेसह १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. पिंप्राळा परिसरातील मयुरी कॉलनी येथे २१ मे २०२१ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. (Jalgaon Crime News)


मयत योगिता मुकेश सोनार यांचे पती मुकेश सोनार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मिळालेल्या विम्याच्या रकमेसह घर आणि प्लॉटच्या कागदपत्रांवरून आरोपी दीपक सोनार, त्याची आई प्रमिला आणि नातेवाईकांकडून योगिता यांना त्रास दिला जात असल्याचे तपासात समोर आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी आर्यन सोनार, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद करत भक्कम पुरावे सादर केले. हे पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने दीपक सोनार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.



Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने