Nashik Crime : हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत महिलेचा मृतदेह, संशयित ताब्यात

Nashik Crime : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील दोडी बु. येथे चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह नारळाच्या बागेतील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संगीता मधुकर जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, आता या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. महिलेचा खून करून हात-पाय बांधून मृतदेह विहिरीत फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अनिल शरद पगारे (१८), रा. दोडी बुद्रुक या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी एक संशयित पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. (Nashik Crime News)



नेमकं काय घडलं ?


७ ऑगस्ट पासून संगीता या बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी संगीता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता, सोबतच घरी कुलूप असल्याचे आढळल्यानंतर नातेवाईकांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. संगीता यांचा शोध लागत नसल्याने अखेर नातेवाईकांनी ८ ऑगस्ट रोजी संगीता जाधव बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. ९ ऑगस्ट रोजी नातेवाईकांनी दोडी बु. परिसरात पुन्हा शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना गावातीलच एका नारळाच्या बागेतील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून, संशयितांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या संघटनेने सोमवारी जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन देखील केले. तसेच वावी पोलिस ठाण्यातही निवेदन दिले‌. (Nashik Crime News)



संशयित ताब्यात


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वावी पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. तपासादरम्यान निफाड तालुक्यातून अनिल पगारे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके आणि पोलिस हवालदार शहाजी शिंदे यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु